Som Pradosh Vrat 2022 Puja Vidhi : सोम प्रदोषला आहे 'हा' विशेष योग; जाणून घ्या पूजेचे महत्व आणि विधी
Pradosh Vrat 2022: 28 फेब्रुवारी म्हणजे सोमवारी येणारा प्रदोष विशेष असून हा व्रत सोम प्रदोष व्रत म्हणून ओळखला जातो. या दिवशी फाल्गुन माघची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आहे. त्यानुसार हा फाल्गुन माघचा पहिला प्रदोष व्रत आहे.

Pradosh Vrat 2022: भगवान विष्णूच्या (Lord Vishnu) पूजेसाठी एकादशीला (Ekadashi) महत्व आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या (Lord Shiva) पूजेसाठी प्रदोषला (pradosh) महत्व आहे. त्यातल्या त्यात प्रदोष जर सोमवारी येत असेल तर श्रेष्ठ योग मानला जातो. अशात 28 फेब्रुवारी म्हणजे सोमवारी येणारा प्रदोष विशेष असून हा व्रत सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat 2022) म्हणून ओळखला जातो. या दिवशी फाल्गुन माघची (Falgun magh) कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आहे. त्यानुसार हा फाल्गुन माघचा (Phalgun Magh) पहिला प्रदोष व्रत आहे. हा सोम प्रदोष व्रत ठेवत विधीवत शिव पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया या व्रताची पूजा-विधी…
Also Read:
या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक, रुद्राभिषेक आणि शृंगार याला विशेष महत्व आहे. या व्रताच्या प्रभावाने लग्नातील अडथळे दूर होतात. यादिवशी भगवान शंकराचा दुधाने अभिषेक करत फुलांची माळा अर्पण करावी. यामुळे संतान सुख, धन लाभासह करिअरमध्ये यश मिळते. अशा पद्धतीने केलेली पूजा भगवान शंकराला अत्यंत प्रिय असल्याची मान्यता आहे.
हा आहे शुभ मुहूर्त –
हिंदू पंचागानुसार 28 फेब्रुवारी रोजी त्रयोदशी तिथी पहाटे 5:42 मिनिटांनी सुरु होत 1 मार्च रोजी पहाटे 3:16 वाजेपर्यंत आहे. या दिवशी सायंकाळी 6:20 ते रात्री 8:49 वाजेदरम्यान मध्य प्रदोष पूजेचा मुहूर्त आहे. यासह याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:02 ते 1 मार्च 2022 रोजी पहाटे 5:19 मिनिटांपर्यंत आहे.
अशी करा पूजा –
या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा घरात बेलपत्र, धूप, अक्षदा, गंगाजल आदीने भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. दरम्यान, पंचामृतने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, धोतराचे फुल, कन्हेरचे फुल, धूप, दीप, फळ, पान सुपारी आदी अर्पण करावे. पूजा दरम्यान ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावत शिव चालीसा पठन करावी. शेवटी भगवान शंकराची आरती करावी.
प्रदोष व्रताच्या दिवशी करू नका हे काम –
प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांनी पूजा करताना तुळसी पत्र, केतकीचे फुल, कुंकू, हळद भगवान शंकराला अर्पण करू नये. यासह भगवान शंकराचा अभिषेक शंखा ने करू नये. प्रदोष व्रत ठेवणाऱ्या भक्तांनी या दिवशी अन्न, मीठ, लाल मिरचीचे सेवन करू नये. यादिवशी पूजेच्या वेळेचे भान ठेवले पाहिजे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या