(डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)
Somvar Vrat Niyam: सोमवारचे व्रत केल्याने पूर्ण होतात भक्तांच्या इच्छा, जाणून घ्या पूजेचे हे नियम
शास्त्रानुसार सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास केल्याने महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.

मुंबई : शास्त्रानुसार सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास (Somvar Vrat) केल्याने महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. सोमवारचे व्रत (Somvar Vrat Importance) अगदी सोपे आहे. परंतु हे व्रत पाळण्याचे काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक वेळा सोमवारचे व्रत आणि पूजेत नकळतपणे काही चुका (Somvar Vrat mistake) होतात आणि या चुकांमुळे उपवासाचे फळ मिळत नाही असे मानले जाते. त्यामुळे जाणून घेऊया सोमवारच्या व्रताचे नियम (Somvar Vrat Niyam) आणि कोणत्या चुका करू नये याविषयी. (Somvar Vrat Vidhi: Don’t make these mistakes in worshiping Mahadev? know the rules of Somvar Vrat)
Also Read:
सोमवारच्या व्रताचे नियम (Somvar Vrat Niyam)
सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ आणि प्रात विधी आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. शक्य असल्यास मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करावा आणि व्रताचा संकल्प घ्या. यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करा आणि व्रताची कथा नक्कीच ऐका. हिंदू शास्त्रानुसार सोमवारच्या व्रतामध्ये तीन प्रहरांमध्ये एकदाच भोजन करावे. उपवासात फलाहार घेऊ शकता.
सोमवारच्या व्रताचे प्रकार (Types of Somvar Vrat)
सोमवारी व्रत करण्याचे तीन प्रकार आहेत. यामध्ये सामान्य प्रति सोमवार, सोम्य प्रदोष आणि सोळा सोमवार यांचा समावेश आहे. तिन्ही उपवासाचे विधी आणि उपासनेचे नियम समान आहेत. सर्व उपवासांमध्ये एकदाच भोजन करावे.
महादेवाची पूजा करताना करू नका या चुका
सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. परंतु या व्रतात चुकूनही करू नका या चूका..
- शिव पूजेमध्ये दुधाचा जलभिषेक केला जातो. लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही.
- शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते.
- शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा.
- भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या