Top Recommended Stories

Somvati Amavasya 2022: या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या कधी?, जाणून घ्या महत्व आणि शुभ योग!

Somvati Amavasya 2022: ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. या अमावस्येला श्राद्धाची अमावस्या असेही म्हणतात.

Updated: January 23, 2022 11:17 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

पितरों का तर्पण
पितरों का तर्पण

Somvati Amavasya 2022: 2022 या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) 31 जानेवारी 2022 रोजी म्हणजेच सोमवारी (Monday) येत आहे. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. या अमावस्येला श्राद्धाची अमावस्या (Shradhachi Amavasya) असेही म्हणतात. ही अमावस्या माघ महिन्यात (Magh Month) येत असल्याने याला माघी अमावस्या (Maghi Amavasya) किंवा मौनी अमावस्या (Mauni Amavasya) असे देखील म्हणतात. यावर्षी सोमवती अमावस्या 31 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2:19 वाजता सुरू होईल आणि 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:16 पर्यंत सुरु राहिल. त्यामुळे येत्या 31 जानेवारी रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल. तर 1 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी मौनी अमावस्या किंवा माघी अमावस्या साजरी केली जाईल. 2022 मध्ये एकूण 13 अमावस्या असतील. यामध्ये दोन सोमवती अमावस्या असतील. पहिली सोमवती अमावस्या 31 जानेवारी 2022 रोजी असेल तर दुसरी 30 मे 2022 रोजी येईल.

Also Read:

सोमवती अमावस्येचे महत्व (Significance of Somavati Amavasya)-

अमावस्या अशुभ मानली जाते पण तसे नाही. अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याचा लाभ देखील होतो. सोमवती अमावस्येला महादेव शंकराची (Mahadev Shankar) उपासना करणे लाभदायक असते. त्यामुळे हिंदू धर्मग्रथांमध्ये सोमवती अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास, उपासना आणि गंगास्नानाला खूप महत्व आहे. स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती आमवस्येच्या दिवशी उपवास करतात. ज्या स्त्रिया सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करतात आणि भगवान शंकर (Bhagwan Shankar) आणि माता पार्वतीची (Mata Parvati) पूजा करतात त्यांना नेहमी सुहागवती होण्याचे वरदान मिळते. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी संपतात. त्याचप्रमाणे पितृदोष निवारणासाठी सुद्धा सोमवती अमावस्या शुभ मानली जाते. या दिवशी विधिवत पूजा केल्यामुळे पितृदोष संपतो.

You may like to read

सोमवती अमावस्या तिथी (Somavati Amavasya Tithi) –

31 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2:19 वाजता सुरू होईल
1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11:16 पर्यंत राहील.

सोमवती अमावस्या शुभ योग (Somavati Amavasya Shubh Yog)-

उत्तराषाढ आणि श्रवण नक्षत्रात वज्र योगानंतर सिद्ध योग तयार होईल.
अभिजीत मुहूर्त – दुपारी 12:18 ते 01:02 पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी 02:01 ते 02:45 पर्यंत
अमृत ​​काळ – सायंकाळी 04:12 ते संध्याकाळी 05:38 पर्यंत
संधिप्रकाश मुहूर्त – संध्याकाळी 05:30 ते संध्याकाळी 05:54 पर्यंत
सर्वार्थसिद्धी योग – 31 जानेवारी रोजी रात्री 09:57 ते 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:10 पर्यंत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 23, 2022 11:14 AM IST

Updated Date: January 23, 2022 11:17 AM IST