(टीप – लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा)

Stomach Health : अनेकांना पोटातील उष्णता (Stomach Heat) आणि जळजळण्याच्या समस्ंयाचा सामना करावा लागतो. पोटातील उष्णतेचा परिणाम (Stomach Heat Effect) अनेकांच्या चेहऱ्यावर देखील दिसू लागतो. या समस्येमुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ लागतात आणि चेहऱ्यावरील तेज हरवते. सामान्यत: काही जड अन्न खाल्लायानंतर ते पचणास अडथळा निर्माण होतो आणि तेव्हा असे घडते. हे अन्न योग्यरित्या पचत नाही आणि पोटात अॅसिड वाढू लागते. ही समस्या टाळण्याचे काही उपाय (Home Remedies) आज आपण जाणून घेणार आहोता.
तुळशीची पाने : तुळशीच्या पाणांचे सेवन केल्याने पोटात पाणी आणि द्रव वाढण्यास मदत होते. हे मसालेदार आणि मिरचीचे अन्न पचवण्यास मदत करते. अशा स्थितीत पोटात जास्त आम्ल तयार होण्यापासून बचाव होते.
बडीशेप : बडीशेपचा प्रभाव खूप थंड असतो आण त्यामुळे पोट गारवा मिळतो. जेवणानंतर बडीशेपचे सेवन केल्याने पोटातील जळजळ, गॅस, उष्णता इत्यादींपासून आराम मिळतो आणि पोटाला थंडपणा मिळतो.
वेलची : वेलचीचा प्रभावही थंड असतो. याचे सेवन केल्याने पोटाची उष्णता, जळजळ, अॅसिडिटी दूर होऊ लागते. वेलची खाल्ल्याने पोटात जास्त अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध होतो.
पुदीना : पुदीना पोटातील उष्णता, जळजळ आणि अॅसिडिटी टाळण्यासाठी फायदेशीर आहे. पुदीनाअँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि औषधी गुणांनी समृद्ध असतो. याचे सेवना केल्यामुळे पचनसंस्था आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
(टीप – लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या