मुंबई : अनेकांच्या शरीरावर वेगवेगल्या कारणामुळं स्ट्रेच मार्क्स (stretch marks) दिसतात. सामान्यत: पायांवर, कंबरेवर आणि मांडीवर हे स्ट्रेच मार्क्स (stretch marks) दिसतात. स्ट्रेच मार्क्सची अनेक कारणे असू शकतात. वजन वाढल्यामुळे देखील शरीराच्या विविध भागांवर स्ट्रेच मार्क्स (stretch marks)दिसतात. गर्भधारणेच्या वेळी देखील स्त्रियांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स (stretch marks) दिसून येतात.Also Read - Skin Care Tips: कोरफडसोबत मिसळा 'या' 3 वस्तू, शरीरावरील सुरकुत्या होतील दूर

काही स्ट्रेच मार्क्स (stretch marks) काळाबरोबर फिकट होत जातात. मात्र काही शिल्लक राहतात. हे स्ट्रेच मार्क्स देखील हटवले जाऊ शकतात. या स्ट्रेच मार्क्समुळे (stretch marks) महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालता येत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशा काही तेलाबद्दल माहिती देणार (stretch marks hatavnyache upay) आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होऊ शकतो. आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या तेलांविषयी माहिती देत आहोत ज्यांचा वापर केल्यास तुम्हाला स्ट्रेच मार्क्स (stretch marks kase dur karave) कमी करण्यास मदत होईल.

एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल : हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत एरंडेल तेल घ्या आणि त्यामध्ये व्हिटॅमिन-ई कॅप्सूल टाकून मिसळा. या मिश्रणाने आपण स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर चांगली मालिश करा. आपण दिवसातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकता. जर आपण 2 ते 3 महिने या मिश्रणाचा वापर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

ऑलिव्ह ऑईल आणि अंडी : एका वाटीत अंड्याचा पांढरा भाग काढून घ्या. त्यामध्ये ऑलिव्ह ऑईलचं थोडं (एक थेंब) घाला आणि स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर ती जागा कोमट पाण्याने धुवा आणि त्यानंतर स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी ऑलिव्ह ऑईलची मालिश करा. याचा नियमितपणे वापर केल्यास आपल्याला फरक जाणवेल.

नारळ तेल : नारळ तेल तुम्ही थेट स्ट्रेच मार्क्सवर लावून मालिश करू शकता. याशिवाय हळदीमध्ये नारळ तेल मिसळूनही तुम्ही ते लावू शकता. दिवसातून दोन वेळा याचा वापर करा.