Surya Grahan 2022 : शंभर वर्षांनी सूर्यग्रहणाच्या दिवशी जुळून आला आहे ‘हा’ योग, जाणून घ्या महत्त्व
Surya Grahan 2022 : चैत्र माहचा (Chaitra Mah ) उद्या म्हणजेच 30 एप्रिल रोजी शेवटचा दिवस आहे. या वर्षाच्या चैत्र माहच्या शेवटच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शनिवार येत असून विशेष म्हणजे याच दिवशी सूर्यग्रहण( Partial Eclipse ) आहे. याच दिवशी शनि अमावस्या ( Shani Amavasya ) देखील येत आहे.

Surya Grahan 2022 : चैत्र माहचा (Chaitra Mah ) उद्या म्हणजेच 30 एप्रिल रोजी शेवटचा दिवस आहे. या वर्षाच्या चैत्र माहच्या शेवटच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शनिवार येत असून विशेष म्हणजे याच दिवशी सूर्यग्रहण( Partial Eclipse ) आहे. याच दिवशी शनि अमावस्या ( Shani Amavasya ) देखील येत आहे. सोबतच एकदिवस आधी म्हणजे आज (29 एप्रिल रोजी) शनिग्रह राशी पारिवर्तन ( Shani Rashi Parivartan ) करत कुंभ राशीत (Kumbh Rashi ) प्रवेश करीत आहे. शनिवार आणि शनिदेव यांच्याशी संबंधित असा पहिल्यांदाच योग आला असे नाही, तर याआधी हिंदू नववर्ष विक्रम संवतची सुरुवात देखील शनिवारपासून झाली होती. त्यानुसार हिंदू नववर्ष विक्रम संवत 2079 चे राजा ग्रह शनि आहे. शनिदेव सूर्य देवाचे पुत्र आहे. सूर्यग्रहणाचा शनिवारच दिवस शनि देवाला समर्पित आहे. यासह या दिवशी शनि अमावस्या देखील येत आहे. एवढेच नाही तर 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार असा योग 100 वर्षांनंतर बनत आहे. अशा या योगात काही उपाय केल्यास अतिशय फायदेशीर ठरतता. जाणून घेवूया त्या उपायांबाबत…
Also Read:
करा हे उपाय –
शनी आणि सूर्याशी संबंधित या दुर्लभ योगात काही उपाय खूप फायदेशीर ठरतात. ज्या व्यक्तींना शनिची साडेसाती आहे. अशा लोकांनी अमावस्येला विशेष उपाय केल्यास लाभ मिळतो. शनिच्या कुंभ राशी प्रवेशानंतर कर्क आणि वृश्चिक राशीवर शनिचा नकारात्मक प्रभाव जाणवेल. तर मकर, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होईल. त्यामुळे शनिचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.
- सूर्यग्रहण-शनी अमावस्येच्या दिवशी शनी देवावर तेल अर्पण करावे.
- काळ्या कपड्यात उडदाची डाळ आणि काळे तीळ बांधून शनि मंदिरात दान करावे.
- शनि देवासह भगवान शंकर आणि संकटमोचक हनुमानाची पुजा करावी. यामुळे शनी दोषापासून मुक्ती मिळेल.
- पिंपाळच्या झाडाला जल अर्पण करावे.
- ग्रहणनंतर स्नान करून दान करावे.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या