Surya Grahan 2022: सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी चुकूनही या गोष्टी करु नये, घ्या जाणून!
Surya Grahan 2022: भारतामध्ये आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळे सुतक कालावधी वैध नाही. परंतू या काळामध्ये प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनी (pregnant women) ग्रहण काळामध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Surya Grahan 2022 : 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Surya Grahan 2022) या आठवड्यात म्हणजेच येत्या 30 एप्रिल रोजी आहे. पृथ्वीवरील दक्षिण गोलार्धाच्या काही भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. शनी अमावस्येच्या (Shani Amavasya) रात्री 12.15 वाजता सूर्यग्रहण सुरु होणार असून ते 1 मेच्या पहाटे 4.07 वाजता समाप्त होणार आहे. सूर्यग्रहणाचा (solar eclipse ) आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टींवर परिणाम होतो.
Also Read:
भारतामध्ये आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळे सुतक कालावधी वैध नाही. परंतू या काळामध्ये प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनी (pregnant women) ग्रहण काळामध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर योग्य काळजी घेतली नाही तर काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आपण सूर्य ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणते काम करणे टाळावे हे जाणून घेणार आहोत…
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी या गोष्टी टाळाव्या –
– ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे अन्न दूषित होते त्यामुळे गर्भवती महिलांनी जेवण करु नये. त्यामुळे या महिलांनी ग्रहणाच्या आधी शिजवलेल्या अन्नावर तुळशीची पानं किंवा गंगाजल घालावे.
– ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी सुई, चाकू, कात्री अशा वस्तूंपासून दर राहावे किंवा त्यांचा वापर करु नये. असे म्हटले जाते की अशा वस्तूंचा वापर केला तर जन्मलेल्या मुलांवर दुष्परिणाम होऊ शकतो.
– ग्रहण सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. कारण ग्रहणाचा बाळावर नकारात्मक परिणाम होतो.
– गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहू नये. ग्रहण पाहिल्याने त्यांच्या पोटातील बाळावर परिणाम होऊ शकतो.
– गर्भवती महिलांनी सूर्य ग्रहणाच्या काळामध्ये हनुमान चालीसा किंवा दुर्गा चालीसाचे पठण करावे. हनुमान आणि दुर्गा मातेच्या कृपेने सर्व संकटं दूर होतात.
– नाही तर गर्भवती महिलांनी सूर्य ग्रहणाच्या काळामध्ये त्यांच्या प्रमुख देवतेचे स्मरण करावे.
– ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर गर्भवती महिलांनी आंघोळ करुन स्वच्छ कपडे घालावीत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या