Surya Namaskar: योगानंतर आता सूर्यनमस्कारही होणार ग्लोबल, मकरसंक्रांतीला 75 लाख लोक करणार सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हे देखील एक प्रकारचे योग आसन आहे. यामध्ये शरीराचे 10 भाग एकामागून एक वापरले जातात आणि 12 चरणांमध्ये 8 प्रकारची आसने सूर्यनमस्कारात पूर्ण होतात.

Published: January 10, 2022 3:04 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Surya Namaskar: योगानंतर आता सूर्यनमस्कारही होणार ग्लोबल, मकरसंक्रांतीला 75 लाख लोक करणार सूर्यनमस्कार
Surya Namaskar Surya Namaskar will be global after yoga, 75 lakh people will perform Surya Namaskar on Makar Sankranti

Surya Namaskar: 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांनी योगाचा आपल्या आयुष्यात समावेश केला आणि निरोगी राहण्याचा मंत्र देखील आत्मसात केला. सूर्यनमस्कार (Surya Namaskar) हे देखील एक प्रकारचे योग आसन आहे. यामध्ये शरीराचे 10 भाग एकामागून एक वापरले जातात आणि 12 चरणांमध्ये 8 प्रकारची आसने सूर्यनमस्कारात पूर्ण होतात. एकूणच सूर्यनमस्कार हा शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा योग आहे. योगानंतर आता भारत सरकारने सूर्यनमस्काराला देखील जागतिक बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

Also Read:

शुक्रवार 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2022 Date) निमित्ताने आयुष मंत्रालय (Ministry of AYUSH) जागतिक स्तरावर 75 लाख लोकांसाठी जागतिक सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांतीला (Makar Sankranti) खूप महत्त्व आहे. या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. यामुळे उत्तर गोलार्धात हळूहळू उष्णता वाढू लागते. हिवाळा सुरू झाल्याने वातावरण आल्हाददायक होते. झाडांवर नवीन कळ्या फुटू लागतात, बागांमध्ये फुले उमलू लागतात. म्हणजेच निसर्ग नटूनथटून सूर्यदेवाचे उत्तर गोलार्धात आल्यावर मनापासून स्वागत करतात.

आनंद तसेच आरोग्य आणि संपत्ती प्रदान केल्याबद्दल निसर्गाचे आभार मानण्यासाठी हा प्रसंग साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक दिवसांच्या हिवाळ्यानंतर पुन्हा एकदा सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडू लागतात. या दिवशी सूर्याच्या प्रत्येक किरणांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. विशेषत: या दिवशी सूर्यनमस्कार केला जातो. कारण सूर्य सर्व सजीवांचे पोषण करतो.

14 जानेवारीला सामूहिक सूर्यनमस्कार करण्याचाही एक विशेष उद्देश आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा संदेशही यावेळी देण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम आपल्या भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे महत्त्व देखील दर्शवतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 3:04 PM IST