Swami Ramdas Navami 2022: वयाच्या 12 व्या वर्षीच सोडलं होतं घर, हनुमानाचा अवतार म्हणून व्हायची रामदास स्वामींची पूजा!
Swami Ramdas Navami 2022: 'दासबोध'ची (Dasbodh) रचना करणारे संत रामदास स्वामी (Sant Ramdas Swami) हे महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी एका आहे. हनुमानाचे (Hanuman) अवतार म्हणून त्यांची दक्षिण भारतात (South India) पूजा केली जाते. रामदास स्वामींना समर्थ रामदास (Swami Samarth Ramdas) म्हणून देखील ओळखले जाते.

Swami Ramdas Navami 2022: ‘दासबोध’ची (Dasbodh) रचना करणारे संत रामदास स्वामी (Sant Ramdas Swami) हे महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी एका आहे. हनुमानाचे (Hanuman) अवतार म्हणून त्यांची दक्षिण भारतात (South India) पूजा केली जाते. रामदास स्वामींना समर्थ रामदास (Swami Samarth Ramdas) म्हणून देखील ओळखले जाते. अशा या महान संताची आज (25 फेब्रुवारी) नवमी आहे. हा दिवस रामदास स्वामींच्या भक्तांसाठी विशेष आहे. याच दिवशी स्वामी रामदास (Ramdas Navmi 2022) यांनी समाधी घेतले होती. चला तर मग जाणून घेऊ या स्वामी रामदासांच्या जीवनाविषयी माहिती.
संत रामदास स्वामी यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1608 रोजी महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील जांब या तीर्थक्षेत्री झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यकांत पंत तर आईचे नाव राणूबाई होते. वडील सूर्यकांत हे सूर्यदेवाचे उपासक होते. आई राणूबाई या देखील सूर्यदेवाच्या उपासिका होत्या. रामदास स्वामी यांच्या मोठ्या भाऊंचे नाव गंगाधर होते आणि ते एक आध्यात्मिक पुरुष होते.
वयाच्या 12 व्या वर्षी सोडले घर…
रामदास स्वामी यांनी वयाच्या 12 व्या वर्षी घराचा त्याग करत ते नाशिक जिल्ह्यातील टाकळी गावात आले होते. याठिकाणी त्यांनी कठोर तप सुरु केला. दरम्यान, दररोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. त्यानंतर गोदावरी नदीत उभे राहून राम नाम आणि गायत्री मंत्राचा जाप करत. कठोर ताप दरम्यान त्यांनी एक रामायण लिहिले जे ‘करुणाकष्ट’ नावाने प्रसिद्ध आहे. रामदास स्वामींनी सतत 12 वर्ष कठोर केला त्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला.
स्वामी रामदासांनी केले भारत भ्रमण…
दरम्यान, रामदास स्वामी यांनी भारत भ्रमण केले. या काळात श्रीनगर येथे त्यांची भेट शीखांचे चौथे गुरु हरगोविंदजी यांच्याशी झाली. गुरु हरगोविंदजी हे रामदास स्वामी यांना मुघल साम्राज्यात लोकांची होत असलेली दयनीय अवस्थाबाबत सांगतात. हे सर्व ऐकून रामदास स्वामी अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भरतात भ्रमण करत मुघलांच्या अत्याचाराच्या विरोधात लोकांना संघटित करत उपदेश केला. याच काळात त्यांनी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत 1100 मठ आणि आखाड्यांची स्थापना केली.
राम नामाचा जप करत सोडला देह…
रामदास स्वामी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी साताराजवळील एका किल्ल्यावर होते. या किल्ल्याला सज्जन गढ म्हणून ओळखलं जाते. तामिळनाडूच्या एका कारागिराने भगवान राम, सीता माता आणि लक्ष्मणाची मूर्ती बनवून या याठिकाणी पाठविली होती. या मूर्तीसमोर रामदास स्वामी यांनी पाच दिवस निर्जल उपवास केले. त्यानंतर राम नामाचा जाप करात पद्मासनमध्ये बसून ब्रह्मलीन झाले. येथेच त्यांची समाधी असून समाधी दिवसाला ‘दासनवमी’ म्हणून ओळखले जाते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या