By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
House Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही असू नये 'या' देवाचे मंदिर, घरावर पडू देऊ नका ही सावली
काही गोष्टी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो आणि सर्व कामे उत्तम प्रकारे पार पडतात. परंतु काही गोष्टी घरात फक्त नकारात्मकता आणतात.

मुंबई : काही गोष्टी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो आणि सर्व कामे उत्तम प्रकारे पार पडतात. परंतु काही गोष्टी घरात फक्त नकारात्मकता (Negative energy) आणतात. त्यामुळे घरात अशांतता, वादविवाद वाढतच जातात. काही गोष्टीची सावली खूप वाईट मानली जाते. जर या गोष्टींची सावली तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर पडली तर ते अशुभ (Ominous) मानले जाते. त्यामुळे असा गोष्टी स्वतःपासून आणि घरापासून दूर ठेवणे महत्त्वाचे (Vastu Tips) असते. चला जाणून घेऊया अशा गोष्टींविषयी… (Don’t let fall shadow of these things on house, it is considered very ominous, happiness and peace of house can be destroyed)
या गोष्टींची सावली ठेवा घरापासून दूर (House Vastu Tips)
- अनेक लोक मंदिराभोवती घर बांधणे खूप शुभ मानतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की मंदिराजवळ घर बांधणे शुभ मानले (Not considered auspicious) जात नाही. दुर्गा देवी किंवा चंडीदेवीच्या मंदिराभोवती कधीही घर बांधू नये.
- घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही सूर्य, ब्रह्मा, विष्णू किंवा शिवाचे मंदिर असू नये. जर तुमचे घर या मंदिरांच्या जवळ असेल तर या मंदिरांची सावली तुमच्या घरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. ते अशुभ (Ominous) मानले जाते.
- तुमच्या घराच्या आजूबाजूला पूर्व, उत्तर आणि ईशान्य कोनात मोठा खडक किंवा मोठा दगड किंवा खांब असू नये. तो अशुभ मानला जातो.
- घराच्या आजूबाजूची जागा नेहमी स्वच्छ असावी. घराशेजारी चिखल नसावा. याशिवाय घराच्या मुख्य दरवाजासमोर झाड, भिंत, कोपरा, खंदक, विहीर आणि मंदिराची सावली पडू नये. ते अशुभ मानले जाते.
(डिस्क्लेमर : लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या