Omicron Variant: ओमिक्रॉनची लागण झाल्यावर तिसऱ्या दिवशी दिसतात ही लक्षणं, वेळीच घ्या स्वत:ची काळजी!
कोरोनाची आधीच भीती असताना त्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आणखी भर घातली आहे.

Omicron Variant: देशात कोरोनामुळे (Corona Virus) पुन्हा चिंता वाढली आहे. कोरोनाने (Covid-19) हात-पाय पसरायला सुरुवात केली असून देशभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची आधीच भीती असताना त्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनने (Omicron) आणखी भर घातली आहे. देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये (Omicron Patient) देखील झपाट्याने वाढ होत आहे. रोज ओमिक्रॉन रुग्णांचा नवा आकडा समोर येत आहे त्यामुळे आणखी भीती वाढत आहे. अशामध्ये ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर नेमकी काय लक्षणं दिसतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. एम्सच्या डॉक्टरांनी (AIMS Doctor) सांगितले की, ‘ओमिक्रॉनची लागण (Omicron Symptoms) झाल्यानंतर तीन दिवसांनी रुग्णांमध्ये लक्षणे दिसू लागतात. लक्षणांच्या आधारे या रुग्णांना घरीच बरे केले जाऊ शकते. फक्त काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता भासू शकते.’
Also Read:
एम्सच्या मेडिसिन विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ नीरज निश्चल यांनी सांगितले की, ‘सध्या ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णसंख्या वाढत आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर बऱ्याच लोकांना तीन दिवसांनंतर लक्षणं दिसू शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave Of Corona) समोर आलेल्या डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) लागण झालेल्या रुग्णांमध्ये चार दिवसांनंतर लक्षण दिसत होती. अल्फा व्हेरिएंटमध्ये (Alfa Variant) पाच दिवसांनंतर लक्षणं दिसत होती. म्हणजे इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) लागण झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणं लवकर दिसून येतात.
अशा सौम्य लक्षणांवर घरीच करा उपचार –
– ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात रहावे. तब्येत बिघडल्यास त्वरित डॉक्टरांना कळवा किंवा रुग्णालयात जा.
– डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला ओमिक्रॉनशी संबंधित औषधांसोबत इतर रोगांशी संबंधित औषधे देखील चालू ठेवता येऊ शकतात.
कोरोनाच्या उपचारात मोलिनुपिराविर (Molinupiravir) सारख्या अँटीव्हायरल औषधांव्यतिरिक्त मोनोक्लोनल अँटीबॉडीजबद्दल (monoclonal antibodies) बरीच चर्चा आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ही औषधे जादूची कांडी नाहीत. ओमिक्रॉन हा एक नवीन प्रकार आहे आणि त्यात मोनोक्लोनल अँटीबॉडी काम करतील की नाही हे सांगता येत नाही.
रुग्णालयात कधी जायचे –
– रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होत असल्यास.
– सामान्य खोलीत ऑक्सिजन संपृक्तता पातळी 94 पेक्षा कमी असेल तर.
– जर छातीत सतत वेदना आणि जडपणा जाणवत असल्यास.
– मेंदू नीट काम करत नसल्यास.
– तीन ते चार दिवसांनी लक्षणे वाढतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या