Throat Problem: सर्दीमुळे घसा दुखतोय? मग करून पहा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम
Throat Problem: तुमचा घसा दुखत असेल किंवा खर खर होत असेल तर अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधे घेण्यापूर्वी हे घरगुती उपाय करून पहा. तुम्हाला लवकरच आराम वाटेल.

Throat Problem: तुमचा घसा दुखत असेल किंवा खर खर होत असेल तर अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधे घेण्यापूर्वी हे घरगुती उपाय (Home Remedies) करून पहा. तुम्हाला लवकरच आराम वाटेल. याचे कोणतेही दुष्परिणाम (Side effects) होणार नाहीत आणि तुमची रोगप्रतिकारक (Immunity) शक्तीही मजबूत होईल. आम्ही तुमच्यासाठी असेच काही उपाय घेऊन आलो आहोत ज्यांचा अवलंब केल्याने तुमची घशाची समस्या तर दूर होईलच शिवाय तुम्हाला सर्दीमुळे त्रास होत असेल तर तोही बरा होईल.
Also Read:
हळदीचे दूध (Turmeric milk)
घसादुखी असो किंवा सर्दी त्यासाठी हळदीचा दूधाचा सर्वात जुना उपाय म्हणून उपोग केला जातो. यासाठी अर्धा चमचा हळद पावडर एका ग्लास दुधात उकळा आणि प्या. तुम्हाला हलकासा ताप असेल तरी यामुळे आराम मिळेल.
आल्याचा चहा (Ginger tea)
आल्याचा अर्क घशाला आराम देतो. आजीबाईच्या बटव्यात आल्याचा देखील समावेश आहे. गरम पाण्यात आलं उकळून त्यात मध मिसळ आणि तो अर्क गरम असताना प्या. तुमच्या घशाला आराम मिळेल. आपण त्यात चवीनुसार काळी मिरी देखील घालू शकता.
आलं, गूळ आणि ओवा (Ginger, jaggery and ova)
सर्दीपासून बचाव करण्यासाठी आलं, गूळ आणि ओवा एकत्र तुपात शिजवून दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे खा. यामुळे दोन दिवसात तुमच्या घशाला आराम मिळेल आणि खोकलाही बरा होईल.
गरम पाणी आणि मीठ (Hot water and salt)
कोमट पाण्यात मिठ घालून दिवसातून अनेक वेळा गुळण्या करा. यामुळे घशालाही लवकरच आराम मिळेल.
(डिस्क्लेमर: लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या