Tips to reduce belly fat: तुम्हीही सुटलेल्या पोटामुळे आहात त्रस्त? या 5 सोप्या टिप्स वापरून व्हा फीट

अनेक जण सुटलेल्या पोटामुळे त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. मात्र आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे लटकलेले पोट कमी करू शकता.

Published: January 15, 2022 3:39 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय

Tips To Reduce Belly Fat: अनेक जण सुटलेल्या पोटामुळे (Belly Fat) त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही पोटाची चरबी कमी होत (reduce belly fat) नाही. मात्र आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे लटकलेले पोट कमी (Belly Fat Reduce Tips) करू शकता. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही उपाय करत असाल तर त्यात नियमितता ठेवा. या उपायाने तुम्हाला लागेच दोनच दिवसात परिणाम दिसेल असे नाही. पण जर तुम्ही रोजची सवय लावली तर या उपायाचा (Belly Fat Tips) तुम्हाला परिणाम दिसू शकतो. जाणून घ्या तुमच्या वाढत्या पोटावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स वापरू शकता…

Also Read:

गरम पाणी (Hot water) : हिवाळ्यात गरम पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे तुम्हीला सर्दीसारख्या समस्यांपासून तर दूर राहालच शिवाय तुमच्या पोटावरील चरबी देखील कमी होण्यास मदत होईल. सकाळी दुधाच्या चहाऐवजी गरम उकळलेले पाणी प्या. याने तुमची पचनक्रियाही चांगली राहील. दोन आठवड्यांत गरम पाण्याचा तुमच्या शरीरावर परिणाम दिसून येईल.

साखर आणि मीठ कमी खा (Eat less sugar and salt) : साखरेपासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि मीठामध्ये सोडियम देखील असते त्यामुळे लठ्ठपणा येतो. अनेक स्टडी रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की साखरयुक्त पदार्थांसोबतच जास्त मीठ खाल्ल्यानेही लठ्ठपणा येतो.

लालसेवर नियंत्रण ठेवा (control cravings) : विशेषतः हिवाळ्यात पुन्हा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होते. पण भूक लागल्यावरच असे घडते असे नाही. कधीकधी शरीरात पाण्याची कमतरता असतानाही हे जाणवते. त्यामुळे जेव्हाही काही खावेसे वाटेल तेव्हा पाणी प्या. पाणी पिऊनही भूक लागली तर जेवण करा.

फायबरयुक्त अन्न खा (Eat fiber rich foods) : अन्नातील फायबरमुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही आणि अॅसिडिटीही नियंत्रित राहते. त्यामुळे आहारात सीरियल फूड्सचा नक्कीच समावेश करा. बिस्किटे आणि मैद्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून अंतर ठेवा. कारण त्यामुळे लठ्ठपणाही वाढतो.

नियमित व्यायाम (work out) : शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तुमच्या कंबर आणि पोटावर ताण येणारे व्यायाम निवडा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 3:39 PM IST