Top Recommended Stories

Tea For Weight Loss: व्यायामाशिवाय वजन होईल कमी? त्यासाठी हे खास चहा रोज प्या!

Tea For Weight Loss : कोरोनामुळे जिमही बंद करण्यात आल्याने अनेकांना व्यायाम करता येत नाही. त्यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. त्यांनी हे चहा जरुर ट्राय करा...

Published: January 17, 2022 2:33 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

tea for weight loss
tea for weight loss

Tea For Weight Loss : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोकं विविध प्रकारचा डाएट फॉलो (Diet follow) करतात. कमी अन्न खातात. पण असे करुन काही विशेष बदल दिसून येत नाही आजकाल वजन कमी करणे ही एक मोठी समस्या बनली आहे आणि वर्क फ्रॉम होम (Work From Home) केल्यामुळे लोक आणखी लठ्ठ होत चालली आहेत. कोरोनामुळे (Corona Virus) जिमही बंद (Gym Closed) करण्यात आल्याने अनेकांना व्यायाम (Exercise) करता येत नाही. चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते असे तुम्ही कधी ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला डाएट फॉलो करायला सांगत नाही, तर काही खास चहा पिण्याबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे वजन कमी करणे खूप सोपे होईल….

Also Read:

ग्रीन टी  (Green Tea)

You may like to read

ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहेत. बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. ग्रीन टी रक्त प्रवाह वाढवतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. हे प्यायल्याने तुम्ही वजन झपाट्याने कमी करू शकता आणि तंदुरुस्त राहू शकता.

ब्लॅक टी (Black Tea) –

बर्‍याच लोकांना पोटाच्या चरबीची समस्या असते, ज्यासाठी ते फॅट बर्नर किंवा वजन कमी करणारी अनेक उत्पादनं वापरतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारात ब्लॅक टी म्हणजेच काळ्या चहाचा समावेश करू शकता ज्यामध्ये विशेष घटक असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, त्यात पोषक आणि अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण आढळते.

लेमन टी (Lemon Ginger Tea)-

जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही लेमन टी पिऊ शकता. आले आणि लिंबांचा चहा तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. याशिवाय लेमन टी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही गुणकारी आहे.

ओलोंग टी (Oolong Tea) –

ओलांग टी हा चायनीज चहा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की oolong टी चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या शरीरात साखरेची पातळी जास्त राहिली तर या चहाचा तुम्हाला फायदा होईल. हा चहा कॅटेचिन आणि कॅफिनपासून तयार केला जातो जो वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 17, 2022 2:33 PM IST