Tukdoji Maharaj Jayanti : खेडेगाव स्वयंपूर्ण करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुचवल्या आहेत उपाययोजना
Tukdoji Maharaj Jayanti: भारत हा शेतीप्रधान देश (Indian Culture) असून एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधीक नागरिक खेड्यांमध्ये राहतात. त्यामुळे खेडेगाव स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत देशाची खर्या अर्थाने प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ( Tukdoji Maharaj ) खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयी उपाययोजना सुचविल्या होत्या.

Tukdoji Maharaj Jayanti : भारत हा शेतीप्रधान देश (Indian Culture ) असून एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक नागरिक खेड्यांमध्ये राहतात. त्यामुळे खेडेगाव स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत देशाची खर्या अर्थाने प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ( Tukdoji Maharaj ) खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयी उपाययोजना सुचविल्या होत्या. या उपायोजना आजही प्रभावी ठरत आहेत. अशा या दूरदृष्टी असलेल्या संताची उद्या म्हणजेच 30 एप्रिल रोजी जयंती (Tukdoji Maharaj Jayanti ) आहे. जयंतीनिमित्त जाणून घेवूया त्यांच्याविषयी.
राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या यावली शहीद या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी त्यांना ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली. ‘तुकड्या म्हणे’, असे म्हणत जा, असे सांगितले. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.
समाज प्रबोधनासाठी केला कीर्तनाचा वापर
तुकडोजी महाराजांनी समाजप्रबोधनासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. त्याकाळी अंधश्रध्दा, जातिभेद मोठ्या प्रमाता होते. या चुकीच्या गोष्टी समाजातून दूर व्हाव्यात यासाठी तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर लढा दिला. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना करणाऱ्या तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होत.
जागतिक परिषदेत सादर केलेल्या कीर्तनाने विद्वान प्रभावित
तुकडोजी महाराज 1955 साली विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी जपानला गेले होते. या परिषदेत त्यांनी सदर केलेल्या कीर्तन आणि भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान अत्यंत मोहीत झाले. विश्व हिंदु परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष असलेल्या तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्यानंतरही राष्ट्रहितासाठी अनेक स्तरावर कार्य केले. बंगाल येथील दुष्काळ, चीन युद्ध, पाकिस्तान युद्ध, कोयना भूकंपामुळे उडालेला हाहाःकार या घटनांमध्ये प्रभावित ठिकाणी रचनात्मक मदत कार्याकरिता या सगळ्या मोहिमांवर महाराज स्वतः गेले होते.
ग्रामविकासावर भर
भारत हा शेतीप्रधान देश असून एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक नागरिक खेड्यांमध्ये राहतात. त्यामुळे खेडेगाव स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत देशची खर्या अर्थाने प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयी उपाययोजना सुचविल्या होत्या. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य आहे. अशा या महान संताचे 31 ऑक्टोबर, 1968 रोजी महानिर्वाण झाले.