Tulshichya Panyache Mahatva: रोज सकाळी रिकाम्या पोटी करा तुळशीच्या पाण्याचे सेवन; या समस्यांपासून मिळेल कायमचा आराम
तुळस भारतात पूजनीय मानली जाते. तुळशीला हिंधू धर्मात अत्यंत महत्व आहे. आयुर्वेदात देखील तुळशीचा उल्लेख आहे.

मुंबई: तुळस (Basil) भारतात पूजनीय मानली जाते. तुळशीला हिंधू धर्मात अत्यंत महत्व आहे. आयुर्वेदात देखील तुळशीचा उल्लेख आहे. तुळशीची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. घरासमोर तुळशीचे रोप (Basil plant) लावणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक महत्त्व असण्याव्यतिरिक्त तुळस आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला दररोज रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने कोणते फायदे (Basil Water Benefits) होतात याविषयी सांगणार आहोत. (Tulshichya Panyache Mahatva: Drink Tulsi water on an empty stomach every morning; There will be relief from these problems)
Also Read:
असे बनवा तुळशीच्या पानांचे पाणी (Make Basil Leaves Water)
तुळशीचे पाणी (Tulshiche Pani) बनवण्यासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालून चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यावर त्यात तुळशीची पाने (Basil Leaves) घाला. पाणी उकळून अर्धे होईपर्यंत ते गरम करा. त्यानंतर ते थंड कडून गाळून घ्या आणि दररोज पहाटे रिकाम्या पोटी (Empty stomach) या पाण्याचे सेवन करा. हे पाणी चवदार करण्यासाठी त्यात तुम्ही मध (Honey) देखील घालू शकता. सकाळी चहा किंवा लिंबूपाण्याऐवजी तुम्ही तुळशीच्या पाण्याचे सेवन (Tulshichya Panyache Mahatva) करुन आरोग्य उत्तम ठेऊ शकता. (Tulshichya Panyache Mahatva: Drink Tulsi water on an empty stomach every morning; There will be relief from these problems Tulsi Water Benefits Tulshiche Pani)
तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे (Basil Water Benefits)
- तुम्हाला सर्दी झाली असे किंवा तुमचा घसा दुखत असेल तर रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी (Tulsi Water Benefits) प्यायल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.
- शुगरच्या रुग्णांनाही तुळशीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शुगरची पातळी नियंत्रणात राहते.
- दररोज तुळशीचे पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
- रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर राहतात. बद्धकोष्ठता आणि लूज मोशनच्या समस्येपासूनही आराम मिळतो. याशिवाय पोटही उत्तम राहते.
- रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने तापही बरा होतो. याशिवाय या पाण्याचे सेवन केल्याने विषाणूजन्य संसर्ग देखील बऱ्याच प्रमाणात टाळता येतात.
(डिस्क्लेमर: लेखात दिलेला सल्ला फक्त सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या