Tulsi Puja Niyam: तुळशीची पूजा करताना लक्षात ठेवा हे 5 नियम, विनाकारण पाने तोडल्याने येते दुर्भाग्य
Tulsi Puja Niyam: घराच्या अंगणात तुळशी ठेवणे हे खूप चांगले मानले जाते. ही आपली अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. तुळशीशिवाय पूजा-पाठ पूर्णच होत नाही. तुळशीला जल अर्पण करताना मंत्राचे उच्चारण करणे खूप फायदेशीर मानले जाते.

Tulsi Puja Niyam: सनातन धर्मात पूजली जाणारी तुळशी (Tulsi)अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आयुर्वेदातही (Tulsi Ayurved) आहे. तुळशी तोडणे, जल अर्पण करणे, पूजा करण्याचे अनेक नियम धार्मिक ग्रंथांमध्येही आढळतात. शिव कुटुंब वगळून तुळशीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक हिंदू देवतांच्या पूजेत केला जातो. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. ती भगवान विष्णूला (Bhagwan vishnu) खूप प्रिय आहे, म्हणून विष्णूंची पूजा तुळशीभोगाशिवाय अपूर्ण मानली जाते. अशा वेळी तुळशीची पूजा (Tulsi pujan) करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. यामुळे काही नियम हे नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे असते. तुळशीची पूजा करताना जर मंत्रोच्चार (Tulsi mantra) केला तर घरात सुख-समृद्धी नांदते.
Also Read:
- Coronavirus Updates: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक! हॉस्पिटलमध्ये जमिनीवर उपचार तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी वेटिंग
- Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीबाबात फडणवीसांच्या दाव्याला संजय राऊतांचं उत्तर
- Astro Tips: तुमची मेष रास असेल तर सावधान, 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी धोक्याची धंटा...
तुळशीला पाणी घालण्याचे 5 नियम
- तुलशीला जल अर्पण करण्यापूर्व कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करु नये.
- सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करणे उत्तम मानले जाते. तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना ते
- गरजेपेक्षा जास्त असून याकडे विशेष लक्ष द्यावे.
- धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.
- रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी
- तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते.
- आंघोळ केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करू नये.
या तीन गोष्टींची घ्यावी काळजी
- तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते, त्यामुळे तुळशीची पाने तोडण्यापूर्वी हात जोडून त्यांची परवानगी घेणे फार महत्वाचे आहे.
- तुळशीची पाने चाकू, सुरी किंवा नखांच्या मदतीने तोडू नयेत.
- कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत. असे करणे दुर्भाग्यपूर्ण मानले जाते.
तुळशीला जल अर्पण करण्याचा मंत्र
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण कराल तेव्हा तुम्ही मंत्र अवश्य पठण अवश्य करावे. यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते, तसेच आरोग्य लाभही होते.
तुळशी मंत्र
महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी।
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।