बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss Winner) आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Actor Sidharth Shukla) याचं गुरुवारी हृदयविकारामुळे (Heart Attack) निधन झालं. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थनं जगाचा निरोप घेतला. आज तरुणाईसमोर हार्टअटॅक एक मोठी समस्या बनली आहे. लाईफस्टाईलमध्ये बदल झाल्यामुळे हार्टअटॅक आता कुणालाही येऊ शकतो. वाढत्या वयानुसार हार्टअटॅकचा धोका वाढत जातो. या अनुषंगानं आम्ही आपल्यासाठी हृदयविकाराच्या लक्षणांबाबत (Symptoms of Heart Attack) माहिती घेवून आलो आहे. तुमच्या शरीरात देखील असे काही लक्षणं दिसत असतील तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका.Also Read - Shocking: पेनिसची लांबी मोजण्यासाठी मुलानं गुप्तांगात घातली USB Cable,नंतर झालं असं...

हार्ट बीट्स-

जास्त नर्वस किंवा एक्साइटेड झाल्यानंतर आपले हार्ट बीट्स वाढणं किंवा कमी होणं ही सामान्य बाब आहे. परंतु तुमच्या हार्ट बीट्स एक सेंकदापेक्षा जास्त वेळेसाठी अनियंत्रित होत असेल तर मोठी समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करावा. Also Read - Curry Patta che Fayde: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा कढीपत्ता; वजन कमी करण्यापासून ते केस गळतीपर्यंतच्या समस्या होईल दूर

ठंडगार घाम येणे, उलटी होणे-

काही लोकांना अचानक ठंडगार घाम येतो. त्यांना उलटी होती. मळमळ सुरू होते. विशेष म्हणजे महिलांमध्ये ही लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. Also Read - Viral Fever Symptoms: जाणून घ्या व्हायरल फीव्हरची लक्षणं आणि घरगुती उपाय

शुद्ध हरपणे-

दी हेल्थ डॉट कॉमनुसार, जर तुम्ही शुद्ध हरपली असेल आणि तुम्हाला गरगरत असेल तर समजून जावं की ही समस्या हृदयविकाराशी संबंधीत आहे.

हात किंवा पायाच्या टाचेला सूज येणे-

एखाद्या व्यक्तीच्या हात किंवा पायाच्या टाचेला सूज येत असेल तर समजून जावे की, विषय गंभीर आहे. डॉक्टर्स सांगतात की, हृदयाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर हात किंवा पायला सूज येते.

खांद्यात वेदना-

हात किंवा खांद्यात अचानक वेदना सुरू होत असेल. त्याचबरोबर कंबर दुखत असेल तर दुर्लक्ष करू नये. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.