Top Recommended Stories

जाणून घ्या त्वचेवर हळद लावण्याचे फायदे - Twachevar Halad Lavnyache Fayde

Twachevar Halad Lavnyache Fayde: हळदीचा वापर करून आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करता येते. प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळणारी हळद केवळ भाजीतच रंग आणत नाही तर आरोग्य राखण्यासाठीही उपयुक्त आहे.

Published: February 26, 2022 11:57 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

जाणून घ्या त्वचेवर हळद लावण्याचे फायदे - Twachevar Halad Lavnyache Fayde
Twachevar Halad Lavnyache Fayde

Twachevar Halad Lavnyache Fayde: हळदीचा वापर करून आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करता येते. प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळणारी हळद केवळ भाजीतच रंग आणत नाही तर आरोग्य राखण्यासाठीही (Turmeric Benefits for Skin) उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तुमची त्वचा ग्लोइंग किंवा डागरहित करायची असेल (Skin Care) तरीही हळद तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू (Skin Care Tips) शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की तुम्‍ही तुमच्‍या त्वचेवर हळदीचा वापर कशाप्रकारे करू शकता. तसचे त्याचे फायदे (Halad Lavnyache Fayde) देखील जाणून घेऊया…

Also Read:

पिंपल्सची समस्या करा दूर

तुम्ही पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर हळद आणि कोरफडीपासून बनवलेला मास्क तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्ही सर्वप्रथम कोरफड जेलमध्ये हळद पावडर मिसळा आणि त्यानंतर ते मिश्रण तुमच्या त्वचेवर 15 ते 20 मिनिटे लावा. त्यानंतर कोमट पाण्याने तुमची त्वचा स्वच्छ धुवून घ्या. असे केल्याने पिंपल्सची समस्या दूर होईल आणि त्याच वेळी त्वचा देखील मऊ आणि ग्लोइंग (Turmeric for Skin) होईल.

You may like to read

तेलकट त्वचेपासून सुटका

तुम्ही तुमच्या त्वचेवर असलेल्या अतिरिक्त तेलाने त्रस्त असाल तर हळद, चंदन आणि गुलाब जल यांचे मिश्रण तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी हळद पावडर, गुलाब जल आणि चंदन एका भांड्यात चांगले एकत्र करा आणि ते मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर तुमची त्वचा सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने त्वचेचे अतिरिक्त तेल तर निघेलच शिवाय त्वचा चमकदार दिसू लागते.

त्वचेवर येईल चमक

तुम्हाला तुमच्या त्वचेची चमक कायम ठेवायची असेल तर हळद पावडर, दही आणि बेसन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका वाडग्यात तिन्ही गोष्टी घेऊन एकत्र करा. त्यानंतर हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे त्वचेवर लावा. मिश्रण सुकल्यावर सामान्य पाण्याने धुवा. असे केल्याने त्वचा चमकू लागते.

(टीप – हळदीच्या वापराने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. पण जर तुम्हाला वर बनवलेल्या पेस्टमध्ये काही अडचण येत असेल तर ती वापरू नका. तसेच कोणताही उपाय करुन पाहण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 26, 2022 11:57 AM IST