(डिस्क्लेमर : लेखात दिलला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)
Boiled Potato Benefits: वजन कमी करण्यासाठी रोज खा एक उकडलेला बटाटा, फायदे इतके की जाणून व्हाल आश्चर्यचकित!
प्रत्येक भारतीय घरात बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बटाट्याचा वापर कोणत्याही भाजीत करता येतो. पण अनेकांच्या मते बटाट्याचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा येतो. त्यामळे लोक बटाट्याचे कमीत कमी सेवन करतात.

Aloo Khanyache Fayde: प्रत्येक भारतीय घरात बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बटाट्याचा (Aloo ) वापर कोणत्याही भाजीत करता येतो. पण अनेकांच्या मते बटाट्याचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा येतो. त्यामळे लोक बटाट्याचे कमीत कमी सेवन करतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा प्रकारे बटाट्याचे सेवन करण्याबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन अजिबात वाढणार (Aloo Khanyache Fayde) नाही. आम्ही उकडलेल्या बटाट्याविषयी बोलत आहोत. उकडलेले बटाटे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर (Potatoes beneficial for weight loss) ठरतात. उकडलेले बटाटे पोटॅशियम, फॉस्फरस, बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन-सी यांचा खजिना आहे. याशिवाय त्यात कॅलरी आणि चरबी देखील कमी असते. उकडलेले बटाटे खाल्ल्याने शरीरात ऊर्जा (Body Energy) येते. आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या बटाट्याचे काही फायदे (Benefits of Potatoes) सांगणार आहोत. चला जाणून घेऊया त्याचे फायदे…
Also Read:
पोषक तत्वांनी युक्त : उकडलेल्या बटाट्यामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. याच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटकही आढळतात. त्यामुळे उकडलेला बटाटा सालीसह खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत : उकडलेले बटाटे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहेत. रोज एक उकडलेला बटाटा खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी-6 मिळते. यामध्ये व्हिटॅमिन-सी देखील जास्त प्रमाणात असते.
फॉस्फरसने भरपूर : उकडलेले बटाटे भरपूर प्रमाणात पोषक असतात. उकडलेल्या बटाट्यात सुमारे 25 टक्के जास्त मॅग्नेशियम असते. त्यात फोलेट देखील भरपूर असते त्यामुळे गर्भधारणेदरम्यान बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासही ते मदत होते.
तोंडाच्या अल्सरसाठी फायदेशीर : तोंडातील अल्सरच्या समस्येवर बटाटा खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बटाटे जरूर खावेत. बटाट्याच्या सेवनाने तुमचा मेंदू निरोगी राहण्यासही मदत होते. शरीरातील ग्लुकोजची पातळी, ऑक्सिजनचा पुरवठा, हार्मोन्स, एमिनो अॅसिड आणि फॅटी अॅसिड आणि ओमेगा -3 सारख्या घटकांनी समृद्ध असल्यामुळे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या