Rose Dayने झाली Valentine's Weekची सुरुवात, जाणून घ्या कोणत्या तारखेला आहे कोणता डे!

Valentine Week 2022: व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. या वेळ व्हेलेंटाईन वीकमध्ये कोणत्या तारखेला कोणता डे आहे हे घ्या जाणून...

Updated: February 7, 2022 5:25 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

valentine day 2022
valentine day 2022

Valentine’s Week 2022 : प्रेमाचा महिना (Love Month) म्हणजे फेब्रुवारी सध्या सुरु आहे. या महिन्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतात. फेब्रुवारी येताच बरेच लोक आपल्या प्रियजनांसोबत रोमँटिक डेटवर (Romantic Date) जाऊन त्यांना प्रेमाच्या खास भेटवस्तू देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी तरुण-तरुणी आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देतात आणि प्रेमाचा संदेश पाठवतात. व्हॅलेंटाईन डे हा केवळ एका दिवसाचा नसून हा प्रेमाचा उत्सव आठवडाभर चालतो. व्हॅलेंटाईन डेच्या आधी रोज डे (Rose Day), प्रपोज डे (Prapose Day), चॉकलेट डे (Chocolate Days), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Promise Day ), हग डे (Hug Day) आणि किस डे (Kiss Day) साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. या वेळ व्हेलेंटाईन वीकमध्ये (Valentine’s Week) कोणत्या तारखेला कोणता डे आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत…

Also Read:

व्हॅलेंटाईन वीक 2022 कॅलेंडर (Valentine’s Week 2022 Calender)

रोझ डे – 7 फेब्रुवारी – सोमवार
प्रपोज डे – 8 फेब्रुवारी – मंगळवार
चॉकलेट डे – 9 फेब्रुवारी – बुधवार
टेडी डे – 10 फेब्रुवारी – गुरुवार
प्रॉमिस दिन – 11 फेब्रुवारी – शुक्रवार
हग डे – 12 फेब्रुवारी – शनिवार
किस डे – 13 फेब्रुवारी – रविवार
व्हॅलेंटाईन डे – 14 फेब्रुवारी – सोमवार

कोणत्याही नवीन नातेसंबंधात सुरुवात करण्यापूर्वी किंवा कोणत्याही व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यापूर्वी गुलाब हा सर्वोत्तम पर्याय आहे. आजकाल बाजारात अनेक रंगांचे गुलाब उपलब्ध आहेत. त्यात लाल, गुलाबी, पिवळा आणि पांढरा गुलाब आहे. ही फुले भेट म्हणून दिल्यास कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद येऊ शकतो.

रंगानुसार गुलाबाचा अर्थ –

लाल गुलाब (Red Rose)-
लाल गुलाब प्रेम, उत्कटता आणि भावनांशी संबंधित असल्याचे मानले जाते. लाल गुलाबाची खासियत म्हणजे ते देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देऊ शकता.

पिवळा गुलाब (Yellow Rose) –
पिवळा गुलाब हे मैत्रीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना सांगायचे असेल की तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे तर तुम्ही त्यांना पिवळे गुलाब देऊ शकता. पिवळा रंग आनंद आणि चांगले आरोग्य देखील प्रतीक आहे.

पांढरा गुलाब (White Rose)-
पांढरा गुलाब तेव्हा दिला जातो जेव्हा तुमची कोणाशी खूप भांडण झाली असेल पण आता तुम्हाला सर्वकाही विसरून नवीन पद्धतीने तुमच्या नात्याची सुरुवात करायची आहे. याशिवाय पांढरा गुलाब शांततेचे प्रतीक मानला जातो.

गुलाबी गुलाब (Pink Rose) –
व्हॅलेंटाईन डे फक्त जोडप्यांसाठी नाही. तुम्ही तुमच्या पालकांसोबतही तो साजरा करू शकता. अशा परिस्थितीत, रोझ डेच्या दिवशी तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब देऊ शकता. एखाद्याचे आभार मानण्यासाठी गुलाबी गुलाब दिले जातात.

केशरी गुलाब ( Orange Rose) –
गुलाबाचा हा रंग उत्कटतेचे प्रतीक आहे. हे उत्साह, इच्छा दर्शवते. जोडपे त्यांच्या प्रेमात उत्कटता आणि उत्साह आणण्याचे प्रतीक म्हणून नारिंगी गुलाब देऊ शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 7, 2022 5:25 PM IST

Updated Date: February 7, 2022 5:25 PM IST