Top Recommended Stories

Varuthini Ekadashi 2022 : आज वरुथिनी एकादशी, जुळून आलाय खास योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Varuthini Ekadashi 2022 : चैत्र माहच्या (Chaitra Mah ) कृष्ण पक्षात (krishna Paksh)  येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) म्हणतात.  धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी व्रत (Ekadashi Vrat Vidhi) केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते.

Published: April 26, 2022 9:41 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Varuthini Ekadashi 2022 : आज वरुथिनी एकादशी, जुळून आलाय खास योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Varuthini Ekadashi 2022 : हिंदू पंचागनुसार, दर महिन्यात दोन वेळा एकादशी (Ekadashi) येते. एकादशीला भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केली जाते. चैत्र माहच्या (Chaitra Mah) कृष्ण पक्षात (Krishna Paksha) येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi 2022) म्हणून ओळखले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, एकादशीच्या दिवशी व्रत (Ekadashi Vrat Vidhi) केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते. आज म्हणजेच 26 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी आहे. यासह आज त्रिपुष्कर योग देखील जुळून आला असून या एकादशीचे धार्मिक महत्त्व वाढले आहे. त्यानुसार जाणून घेऊया वरुथिनी एकादशीला जुळून आलेला योग, पूजा-विधी आणि मुहूर्ताविषयी सविस्तर…

Also Read:

पुराणानुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला वरुथिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व कष्टापासून मुक्ती मिळते. यासह व्यक्तीसाठी स्वर्गाचे मार्ग उघडतात. सूर्यग्रहणाच्या दिवशी दान केल्याने जे फळ प्राप्त होते, तेच फळ या दिवशी व्रत केल्याने प्राप्त होते. हे व्रत केल्याने मनुष्य लोक आणि परलोकात व्यक्तीला सुख प्राप्त होते. मान्यता आहे की, या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णू भक्तांची सर्व संकटातून मुक्ती करतात. तसेच सुख समृद्धीचे वरदान देखील देतात.

You may like to read

हा आहे शुभ मुहूर्त

वैदिक पंचांगानुसार चैत्र कृष्ण एकादशी म्हणजेच वरुथिनी एकादशी 25 एप्रिल रोजी मध्यरात्री रात्री 01:36 वाजता प्रारंभ होत आहे. तर 26 एप्रिल रोजी रात्री 12:46 वाजेपर्यंत राहील. सूर्योदयाच्या आधारावर तिथीची गणना होते, त्यानुसार 26 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी राहील. यादिवशी सकाळी 11:52 वाजेपासून शुभ वेळ सुरु होत असून दुपारी 12:45 पर्यंत राहिल.

त्रिपुष्कर योग

वरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग जुळून येत आहे. ज्याचे ज्योतिषमध्ये विशेष महत्त्व आहे. ज्योतिषनुसार या योगात केलेले दान-धर्म आणि पुण्याचे अधिक फळ प्राप्त होते. वरुथिनी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 26 एप्रिल रोजी रात्री 12:46 वाजेपासून त्रिपुष्कर योग सुरु होईल. तर 27 एप्रिल रोजी सकाळी 05:43 वाजेपर्यंत हा योग राहिल.

असे करा व्रत

– वरुथिनी एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी पाण्यात गंगाजल टाकून स्नान कारावे.

– स्नान केल्यानंतर व्रताचा संकल्प घ्यावा.

– या दिवशी भगवान विष्णूला टरबूजचा नैवेद्य द्यावा. आणि मनातल्या मनात भगवान विष्णूंच्या नामाचा जप करावा.

– भगवान विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे. या दिवशी तुळशीला जल अपूर्ण करावे.

– पूजेच्या वेळी एकादशी व्रत कथा वाचली पाहिजे.

– प्रसादामध्ये फळांचा समावेश करावा.

– या दिवशी मिठाचे सेवन टाळावे.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 26, 2022 9:41 AM IST