Vasant Panchami 2022: वसंत पंचमीला करा हे साधे-सोपे उपाय; बुद्धी वाढेल सोबतच आर्थिक भरभराटीही होईल!
Vasant Panchami 2022: वसंत पंचमी (Basant Panchami) म्हणजे सरस्वती मातेचा (mata saraswati) जन्मोत्सव. शनिवारी, 5 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात हे पर्व साजरे केले जात आहे. या दिवशी ज्ञान, बुद्धी आणि विवेकाची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची पूजा (saraswati Puja 2022) केली जाते.

Vasant Panchami 2022: वसंत पंचमी (Basant Panchami) म्हणजे सरस्वती मातेचा (mata saraswati) जन्मोत्सव. शनिवारी, 5 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात हे पर्व साजरे केले जात आहे. या दिवशी ज्ञान, बुद्धी आणि विवेकाची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची पूजा (saraswati Puja 2022) केली जाते. हिंदुपुरानानुसार, माघ महिन्याच्या (magh month) शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला देवी सरस्वती प्रकट झाली होती. सरस्वतीने संपूर्ण ब्रह्माडला ध्वनीचा उपहार दिला होता. म्हणून या दिवशी वसंत पंचमी साजरी करतात. या दिवशी सरस्वतीची विधिवत पूजा आणि काही खास उपाय केल्यास विद्या तर मिळतेच, सोबतच व्यक्तीची आर्थिक भरभराटी देखील होते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे सरस्वतीचे खास उपाय…
Also Read:
या वस्तूंचा द्या नैवद्य…
केसरयुक्त खीरचा देवी सरस्वतीला नैवद्य दाखवावा. सरस्वतीला बुंदी देखील प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी पूजेनंतर बुंदीचा प्रसाद सगळ्यांना द्यावा. बंगाली लोक या दिवशी देवी सरस्वतीला बोरे अर्पण करतात. त्यानंतर स्वतः ते बोरे खातात. प्रसाद म्हणून इतरांना देतात.
गुरूंचा सन्मान करा..
वसंत पंचमीच्या पर्वावर आपल्या गुरूंची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. सरस्वती पूजनासह आपल्या गुरुजनांचा देखील आशीर्वाद घेतला जातो. गुरुवर्यांना एखादी भेटवस्तू द्यावी.
काय आहे गुलालाचे महत्त्व…
वसंत पंचमीच्या दिवशी घरातील लहान मुलांच्या हातून देवी सरस्वतीची पूजा करावी. पूजा करताना देवी सरस्वतीच्या पायावर गुलाल वाहावा. गुलालाने देवी सरस्वतीच्या पदकमलांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. आपल्या देशात काही राज्यात वसंत पंचमीपासूनच होळी खेळण्यास सुरुवात होते.
मुलांना वह्या, पुस्तके भेट द्या..
वसंत पंचमीच्या दिवशी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना पेन, वही, पुस्तके भेट द्यावी. शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिल्याने देवी सरस्वती तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील. डोक्यात कायम सकारात्मक विचार येतात.
विद्यार्थ्यांनी करावा हा उपाय…
विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून सरस्वती वंदना म्हणावी…
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥
शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं।
वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्॥
हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्।
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्॥
श्रीकृष्ण आणि राधेचे करा पूजन
या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा यांची देखील पूजा केली जाते. असे सांगितले जाते, की वसंत पंचमीपासून देवांनी होळी पर्वाची सुरुवात केली आहे. श्रीकृष्ण आणि राधेची पूजा केल्याने कामदेव आणि रति प्रसन्न होते. गृहस्थ जीवनात प्रेम आणि मधुरता कायम राहते. पती-पत्नीत वाद होत असतील तर अशा जोडप्याने रति आणि कामदेवची पूजा करावी. दाम्पत्याला जीवनाचे सुख प्राप्त होते.
संगीतासह आवड असलेल्या कलेचा अभ्यास करावा…
संगीत आणि कलेत रुची आहे, अशांनी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या कलेचा अभ्यास करावा. देवी सरस्वतीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. यासह सरस्वती मंत्र आणि स्तोत्राचा पाठ करावा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या