Top Recommended Stories

Vasant Panchami 2022: वसंत पंचमीच्या दिवशी अशी करा माता सरस्वतीची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त!

Vasant Panchami 2022: आजच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते. या दिवशी लोक पिवळे आणि पांढरे कपडे घालून आई सरस्वतीची पूजा करतात.

Updated: February 5, 2022 8:51 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Vasant Panchami 2022
Vasant Panchami 2022

Vasant Panchami 2022 : वसंत पंचमी (Basant Panchami) म्हणजे सरस्वती मातेचा (mata saraswati) जन्मोत्सव. शनिवारी 5 फेब्रुवारीला म्हणजे आज संपूर्ण देशभरात हे पर्व साजरे केले जात आहे. या दिवशी ज्ञान, बुद्धी आणि विवेकाची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची पूजा (saraswati Puja 2022) केली जाते. आजच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते. या दिवशी लोक पिवळे आणि पांढरे कपडे घालून आई सरस्वतीची पूजा करतात. काही लोक वसंत पंचमीला श्री पंचमी म्हणूनही बोलतात. हा दिवस मुलांसाठी शिक्षण सुरू करण्यासाठी किंवा कोणतीही नवीन कला सुरू करण्यासाठी खूपच शुभ मानला जातो. त्यामूळे आजे विद्येची देवता सरस्वतीची पूजा केली जाते.

Also Read:

अशी करा माता सरस्वतीची पूजा –

आंघोळ केल्यावर भाविकांनी पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेने बसावे. पाटावर पिवळ्या रंगाचे कापड पांघरावे आणि त्यावर माता सरस्वतीची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर केशर, हळद, तांदूळ, पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्य़ा रंगाची मिठाई, साखर, दही, हलवा इत्यादींचा नैवेद्य देवीसमोर ठेवून पूजा करावी. माता सरस्वतीच्या पायावर श्वेत चंदन लावावे. उजव्या हाताने सरस्वतीच्या पायावर पिवळी आणि पांढरी फुलं अर्पण करावी आणि ‘ओम सरस्वत्यै नमः’ जप करावा. महत्वाचे म्हणजे, जर शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाल्यास या दिवशी विशेष पूजा केल्यास त्यापासून मुक्ती मिळू शकते.

You may like to read

पुजेचा शुभ योग –

माता सरस्वतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 07:07 वाजेपासून दुपारी 12:35 वाजेपर्यंत आहे. या मुहूर्तामध्ये माता सरस्वतीची पूजा आणि उपासना केल्यास अधिक फायदा होईल. या दिवशी सरस्वती चालिसा पठण करुन सरस्वती मातेची आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटावा.

वसंत पंचमी तारीख आणि मुहूर्त –

पंचमी तिथ‍ी कधीपासून सुरु –
05 फेब्रुवारी 2022 पहाटे 03:47 वाजेपासून सुरु

पंचमी तिथ‍ी कधी संपणार –
वसंत पंचमी: शन‍िवार, 5 फेब्रुवारी 2022

वसंत पंचमी मुहूर्त –
शनिवार सकाळी 07:07 वाजेपासून दुपारी 12:35 वाजेपर्यंत

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 5, 2022 8:51 AM IST

Updated Date: February 5, 2022 8:51 AM IST