Top Recommended Stories

Vasant Panchami 2022: वसंत पंचमीनिमित्त तुमचा उपवास आहे, मग चुकूनही करु नका या गोष्टी!

Vasant Panchami 2022 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला दरवर्षी वसंत पंचमी साजरी केली जाते. आजच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते.

Updated: February 5, 2022 9:16 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Vasant Panchami 2022
Vasant Panchami 2022

Vasant Panchami 2022 : वसंत पंचमी (Basant Panchami) म्हणजे सरस्वती मातेचा (mata saraswati) जन्मोत्सव. हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शनिवारी 5 फेब्रुवारीला म्हणजे आज संपूर्ण देशभरात वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी ज्ञान, बुद्धी आणि विवेकाची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची पूजा (saraswati Puja 2022) केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला दरवर्षी वसंत पंचमी (Basant Panchami 2022) साजरी केली जाते. आजच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते. या दिवशी लोक पिवळे आणि पांढरे कपडे घालून आई सरस्वतीची पूजा करतात. काही लोक वसंत पंचमीला श्री पंचमी म्हणूनही बोलतात. वसंत पंचमीनिमित्त अनेक जण उपवास करतात. उपवासामध्ये तुम्ही चुकूनही कोणत्या गोष्टी करुन नये आणि कोणत्या गोष्टी कराव्या हे आज आपण जाणून घेणार आहोत….

Also Read:

उपवावसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं (Never Do This On Basant Panchami 2022)-

– या दिवशी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग नकारात्मकता दर्शवतो.

You may like to read

– जर तुम्हाला संपूर्ण दिवस उपवास ठेवता येत नसेल, तर किमान पूजेपर्यंत उपवास ठेवा. खाऊन पिऊन पूजा करू नये. जर दिवसभर उपवास करणे शक्य असेल तर ते चांगले आहे.

– पूजेनंतर प्रसाद खाऊन उपवास सोडावा. उपवास सोडताना फक्त सात्विक अन्नच खावे. या दिवशी मसालेदार पदार्थ किंवा कांदा-लसूनपासून तयार केलेले पदार्थ खाऊ नयेत.

– वसंत पंचमीच्या दिवशी घरातील कोणत्याही सदस्याने मांस आणि मद्य सेवन करू नये. या दिवशी स्वच्छता आणि शुद्धतेची पूर्ण काळजी घ्या.

– कोणाशीही भांडण करु नका. या दिवशी कोणाचेही वाईट करु नका आणि निंदा करू नका. शांतीने देवी सरस्वतीचे ध्यान करा.

– कोणत्याही गरीब, गरजू किंवा असहाय्य व्यक्तीला त्रास देऊ नका. ज्येष्ठांची सेवा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.

वसंत पंचमीच्या दिवशी या गोष्टी करा (Do These Things On Basant Panchami 2022)-

– विद्यार्थ्यांनी ‘ॐ ऐं हृं श्रीं क्लीं सरस्वत्यै बुधजनन्यै स्वाहा’ मंत्राचा 108 वेळा जाप आवश्यक करा. यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होते.

– सकाळची सुरुवात आपल्या तळवे पाहून करावी. तळहाताकडे पाहून माता सरस्वतीची प्रतिमा पहा आणि त्यांना नमस्कार करा.

– मुलांसाठी शिक्षण सुरू करण्यासाठी किंवा कोणतीही नवीन कला सुरू करण्यासाठी माता सरस्वतीची पूजा करा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.