वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. आपण देखील जीवनात वास्तुला विशेष महत्त्व देत असतो. कारण वास्तु अर्थात घर हे आपण मोठ्या मेहनतीनं उभं करत असतो. आपल्यासाठी केवळ त्या चार भिंती नसतात. तर दिवसभराच्या कामाच्या धावपळीने थकल्या भागल्यानंतर जीवाला विसावा देणारी अशी वास्तू असते. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी खास वास्तु टिप्स (Vastu tip) घेऊन आलो आहे.Also Read - Vastu Tips : हळदीचा 'हा' एक उपाय दूर करेल वास्तुदोष, जाणून घ्या अशाच काही विशेष उपायांबाबत माहिती

वास्तुशास्त्रानुसार, घरात वस्तू कोणत्या दिशेला ठेवली आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. घराच्या पायरीखाली ( Vastu Upay) काही वस्तू ठेवल्यास कायम भरभराटी येते. आपलं भाग्य उजळते, असं सांगण्यात आलं आहे. घरावर कायम महालक्ष्मीचा आर्शीवाद असतो. घरात पेशाची चणचण भासत नाही. चला तर मग जाणून घेऊया घराच्या पायरी खाली कोणती वस्तू ठेवावी. Also Read - Vastu Tips : रात्री झोपताना 'या' 4 वस्तू डोक्याजवळ ठेवू नका, नाहीतर होईल नकारात्मक परिणाम

-घराच्या पायरीखाली तुरटी किंवा मीठ ठेवावं. मीठ किंवा तुरटी बारीक करून एका कपड्यात बांधून घ्या. ती पोटली पायरीच्या खाली ठेवा. त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही. Also Read - Kitchen Vastu Tips: वास्तूनुसार किचन कसे असावे? या 10 टिप्स करतील तुमची मदत

-घराच्या पायरीखाली मीठ किंवा तुरटी ठेवल्यानं कीटक, सर्प प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य उत्तम राहील.

-घरात लहान बाळ असेल तर त्याला कोणाचीही दृष्ट लागणार नाही.

-घराच्या पायरीखाली मीठ किंवा तुरटी ठेवल्यानं डोक्यावरील कर्जाचा भार लवकर हलका होतो.

घराच्या उंबरठ्यावर कधीही ठेवू नका या वस्तू…

– घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी साचलं असेल किंवा वाहत असेल तर ते आधी थांबवा. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आरोग्य बिघडतं आणि वास्तुदोष देखील निर्माण होतात.

– घराच्या उंबरठ्यावर कचरा कधीही ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. सोबतच आर्थिक अडचणींना देखील सामोरे जावं लागतं.

-दूध निघणारे रोपटे दिसायला चांगले असतात. मात्र त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. तनावस्थिति उत्पन्न होते.

– घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वृक्ष असणं अशुभ मानलं जातं. मोठ्या वृक्षामुळे घरात हवा खेळती राहत नाही. कायम आर्थिक चणचण भासते.

-घरात किंवा गॅलरीत काटेरी रोपटे लावू नये. त्याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत असतो. मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. काटेरी रोपट्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.