Vastu Tips: घरामध्ये हिरव्या रंगाच्या वस्तू या दिशेला ठेवा, प्रगतीचा मार्ग होईल खुला!
Vastu Tips: हिरवा रंग हा खूप महत्वाचा आहे. हिरव्या रंगाशिवाय निसर्ग अपूर्ण आहे.

Vastu Tips : माणसाच्या आयुष्यामध्ये वास्तुशास्त्राला (Vastu Shastra) खूप महत्त्व आहे. पण बऱ्याच वेळा वास्तूचे ज्ञान नसल्याने लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. पण वास्तूशास्त्र (Vastu Shastra Tips) समजून घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वास्तुदोषांमुळे (Vastu Dosh) कौटुंबिक विघ्न येते आणि अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी वास करत नाही. वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे आणि विविध रंगांचे महत्त्व सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार हिरव्या रंगाच्या (Green Colour) महत्वाबद्दल सांगणार आहोत…
Also Read:
रंगांचे एक वेगळं जग आहे. रंगांशिवाय जीवन देखील रंगहीन वाटू लागते. खरं तर हेच रंग आपल्या जीवनाला (Colours Importance in Life) अर्थ प्राप्त करून देतात. रंगांचं वेगवेगळ्या विषयात महत्व आहे. हिरवा रंग हा खूप महत्वाचा आहे. हिरव्या रंगाशिवाय निसर्ग अपूर्ण आहे हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. तो. आपण दैनंदिन जीवनात हिरव्या रंगाच्या बऱ्याच गोष्टींचा वापर करत असहिरव्या रंगाच्या भाज्या खाणे झाले, घरामध्ये बगीच्यामध्ये हिरव्या रंगाची झाडं लावणं झालं.
हिरव्या रंगात हिरव्या भाज्या, कडधान्ये, झाडे आणि कपडे इत्यादींचा समावेश होतो. वास्तुशास्त्रानुसार हिरव्या रंगाशी संबंधित गोष्टी पूर्व किंवा आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात ठेवणे चांगले असते. तसेच घरामध्ये यापैकी एका दिशेला हिरव्या गवताची छोटीशी बाग (small garden of green grass) तयार करावी. वास्तुशास्त्रानुसार हिरवा रंग आणि या दिशांचा संबंध लाकडाशी आहे. त्यामुळे हिरव्या रंगाच्या वस्तू आग्नेय दिशेला (Southeast) ठेवणे खूप शुभ मानले जाते. हिरव्या वस्तू पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील मोठ्या मुलाच्या जीवनात प्रगती होते. वास्तुशास्त्रानुसार हिरवी वस्तू (Green Objects) आग्नेय कोनात ठेवल्याने मोठ्या कन्येला फायदा होतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या