नवी दिल्ली: नवरात्रीला (Navratri 2021) सुरुवात झाली आहे आणि सर्वत्र या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. घरामध्ये घटस्थापना करण्यासोबतच लोक दुर्गा देवीचीही पूजा करत आहेत. दुर्गा माताला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास देखील केला जातो. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने जीवनात आनंद मिळतो. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर नवरात्रीत वास्तु टिप्सच्या (Navratri Vastu Tips) मदतीने दूर करता येऊ शकते. यामुळे नवरात्रीत घराबाबतच्या वास्तु टिप्स (Vastu Tips for Home) जाणून घेऊयात. (Vastu Tips If you want happiness, peace at home, then follow these Vastu tips in Navratri)Also Read - Tulsi Plant: या लोकांनी घरात तुळशीचं रोप लावू नये, फायदा होण्याऐवजी होईल मोठं नुकसान

घराबाहेर स्वस्तिक बनवा

नवरात्रीदरम्यान आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी (Vastu Tips) स्वस्तिक बनवा. असे मानले जाते की स्वस्तिक बनवल्याने घरात येणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात आनंद येतो. Also Read - Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अलर्ट जारी, गैर काश्मीरी मजुरांना सुरक्षा छावणीत हलवण्याच्या सूचना

आंबा आणि अशोकाच्या पानांचा हार

तुम्ही अनेकदा पाहिले असेल कथेच्या किंवा पूजेच्या वेळी आंब्याच्या आणि अशोकाच्या पानांचे हार बनवले जातात. असे मानले जाते की नवरात्रीदरम्यान घराच्या मुख्य दरवाज्यात आणि मंदिरात आंब्याचे आणि अशोकाच्या पानांचे हार बनवून बांधावे. यामुळे वाईट प्रभाव घरात प्रवेश करत नाहीत. Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा

लक्ष्मीच्या पावलांचे ठसे

असे मानले जाते की नवरात्री दरम्यान दुर्गा देवी नऊ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात येते. या दिवसात घराबाहेरच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे (vastu tips for laxmi) नक्की बनवावे. यामुळे तुमचे सर्व बिघडलेले कामे पूर्ण होतात.

घटस्थापना करताना दिशा लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि ईशान्य दिशा नेहमी पूजेसाठी शुभ मानल्या जातात. नवरात्रीदरम्यान घटस्थापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी आणि या दिशेने आईची मख्खर सजवावे.

काळे कपडे घालणे टाळा

नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नका. कारण काळ्या रंगाचे कपडे शुभ मानले जात नाहीत. नवरात्री दरम्यान कोणतेही अशुभ काम न करण्याचा प्रयत्न करा.