बहुतांश लोक घरात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवत असतात. मूर्तींमुळे घराची शोभा वाढते. परंतु घरात कुठल्या मूर्ती ठेवाव्या, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात मूर्ती ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होता. मात्र, अशा काही मूर्ती आहेत की, त्या घरात ठेवल्यास सुखसमृद्धी नांदते. आर्थिक भरभराटी होते. घरात कायम आनंदाचं वातावरण राहतं. घरात कोणी आजार पडत नाही. चला तर मग जाणून घेऊ या घरात कोण्यात मूर्ती ठेवाव्यात.Also Read - JEE Advanced 2021 Date: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

हत्तीची मूर्ती-

वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. घरात उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. घरात पैशाची कमतरता कधीच जाणवणार नाही. धन आणि ऐश्वर्यात कायम वृद्धी होईल. बेडरूममध्या हत्तीची चांदीची मूर्ती ठेवल्यास घरातील नकारात्मक शक्ती नाहिसी होती. घरात आनंदाचं वातावरण कामय राहील.
Also Read - School Fees Reduction: खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा! शाळांच्या फीमध्ये होणार कपात

हंसांची जोडी असलेली मूर्ती-

घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. हंसांचा जोडा प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. हंसांची जोडी घरात कुठल्याही दिशेला ठेवू शकतात. ते शुभ आणि लाभदायक आहे.
Also Read - Amazon सोबत मिळून कमवा दरमहा 50 ते 60 हजार रुपये, रोज 4 तास करावे लागेल हे काम

कासवाची मूर्ती-

वास्तुशास्त्रानुसार कासव हे भगवान विष्णुचं रूप मानलं जातं. घरात कासवाची मूर्ती ठेवल्यास सुख-समृद्धी नांदते.

पोपटांची जोडी असलेली मूर्ती-

वास्तुशास्त्रानुसार, पोपटांची जोडी असलेली मूर्ती घरात ठेवावी. ते प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. घरात कायम आनंदी वातावरण राहतं. सुख-शांती नांदते. पोपटांची जोडी घरात कोणत्याही दिशेला ठेवू शकतात.