By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Vastu Shastra Tips: तुमच्या घरातील 'या' दिशेकडील भिंतीला तडा गेला आहे का?; मग त्वरित दुरुस्त करा नाही तर होईल अनर्थ!
Vastu Tips: काही जण वास्तुशास्त्राचे नियम पाळतात तर काही जण पाळत नाही. जे नियम पाळत नाहीत त्यांच्या घरात कायम कौटुंबिक कलह सुरु असतो. तुम्ही देखील अशाच समस्येतून जात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Vastu Tips : घरात सुख-शांती नांदावी यासाठी वास्तूशास्त्रात (Vastu shastra) अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. काही जण वास्तुशास्त्राचे नियम (Vastu shastra rules) पाळतात तर काही जण पाळत नाही. जे नियम पाळत नाहीत त्यांच्या घरात कायम कौटुंबिक कलह (Family Conflicts) सुरु असतो. तुम्ही देखील अशाच समस्येतून जात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगितले आहे की, ज्यामुळे कौटुंबिक कलह दूर होत घरात सुख-शांती आणि समृद्धी (happy home) येते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रातील उपायांविषयी…
घराच्या ‘या’ भिंतीला तडे नको –
वास्तूशास्त्रात घराच्या रचनेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार घराची जागा निवडण्यापासून ते घर कसे बांधावे याबाबत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच घरात काय असू नये याबाबत देखील सांगण्यात आले आहे. त्यानुसार घराच्या उत्तर दिशेला असलेल्या भिंतीला तडा जाणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार भिंतीला तडा पडलेल्या घरात कौटुंबिक कलह आणि भांडण कायम होत असतात. त्यामुळे भिंतीला तडा दिसत असेल तर त्वरित दुरुस्त करा. यासह कौटुंबिक कलह वाढला असेल तर तुळशीचे रोप घराच्या उत्तर दिशेला लावा.
छोट्या-छोट्या वस्तू व्यवस्थित ठेवा –
घरात आनंदी वातवरण राहण्यासाठी घरातील छोट्या-छोट्या वस्तू व्यवस्थित ठेवाव्या. घरात आनंद टिकवून ठेवण्यासाठी वस्तू नीट आणि योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश पडावा –
सूर्यप्रकाश हा सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे घर बांधताना लक्षात ठेवा की, सूर्यप्रकाश प्रत्येक खोलीत किंवा किमान बेडरुमध्ये पोहचला पाहिजे असे बांधकाम करा. सूर्य प्रकाशामुळे घरात सकारात्मकता टिकून राहत विसंवादाची परिस्थिती निर्माण होत नाही.
केरसुणी व्यवस्थित ठेवा –
वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू एकमेकांवर ठेवू नये. झाडू एकमेकांवर ठेवल्यास कुटूंबातील महिलांचे एकमेकांशी पटत नाही. दररोज भांडणे होतात. अशा परिस्थितीत मेणबत्तीवर तूप आणि गूळ मिसळून रविवारी जाळून टाका. या उपायामुळे कुटूंबाचे वातावरण सुधारेल.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या