Top Recommended Stories

Vijaya Ekadashi 2022: विजया एकादशीच्या दिवशी या मंत्रांचा करा जप, सर्व इच्छा होतील पूर्ण

Vijaya Ekadashi 2022: फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आज (रविवार) साजरी केली जात आहे. या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून उपवास ठेवला जातो.

Published: February 27, 2022 9:34 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Vijaya Ekadashi 2022:  विजया एकादशीच्या दिवशी या मंत्रांचा करा जप, सर्व इच्छा होतील पूर्ण

Vijaya Ekadashi 2022: फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आज (रविवार) साजरी केली जात आहे. या एकादशीला विजया एकादशी (Vijaya Ekadashi) म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा करून उपवास ठेवला जातो. नावाप्रमाणेच विजया म्हणजे विजय. या दिवशी मनापासून पूजा (Vijaya Ekadashi Puja) केल्याने शत्रूवर विजय मिळवता येतो असे मानले जाते. जेव्हा श्रीराम रावणाशी युद्ध करण्यास तयार झाले तेव्हा त्यांनी युद्धापूर्वी विजया एकादशीचे व्रत (Ekadashi Vrat) ठेवले होते आणि यानंतर त्यांनी लंकापती रावणाशी युद्ध जिंकले, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशा स्थितीत तुम्ही विजया एकादशीला काही मंत्रांचा (Vijaya Ekadashi Mantra) जप करून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता. जाणून घेऊया त्या मंत्रांविषयी…

Also Read:

विजया एकादशीला या मंत्रांचा करा जप

  • तुम्हाला जर चांगली नोकरी मिळवायची असेल तर भगवान विष्णूची पूजा करताना ‘ओम नारायणाय लक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा जप करा. या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने तुम्हाला नोकरी मिळू शकते.
  • विशेष शुभेच्छा प्राप्त करायच्या असतील तर ‘ओम सिया पतिये राम रामाय नमः’ या मंत्राचा जप करावा. यासोबतच श्री राम आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा करावी. असे केल्याने मनाची इच्छा पूर्ण होऊ शकते.
  • घरात सुख-समृद्धी येण्यासाठी ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करा. तसेच भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करा.
  • मान-सन्मान मिळवायचा असेल तर एकादशीच्या दिवशी सूर्यदेवाला लाल चंदन आणि तांदूळ घालून जल अर्पण करा आणि ‘ॐ सूर्य नारायणाय नमः’चा जप करा. असे केल्याने मान-सन्मान मिळू शकतो.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञाशी संपर्क साधा.)

You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 27, 2022 9:34 AM IST