Vijaya Ekadashi 2022: यावर्षी दोन दिवस विजया एकादशी, अशी करा पूजा आणि व्रत!
Vijaya Ekadashi 2022 : यावर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 26 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी सकाळी 10.39 वाजता सुरू होईल आणि रविवारी सकाळी 8.12 वाजता समाप्त होईल.

Vijaya Ekadashi 2022 : यावर्षी सर्वार्थ सिद्धी आणि त्रिपुष्कर योग दरम्यान विजया एकादशी (Vijaya Ekadashi 2022) साजरी होणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशीचे व्रत (Vijaya Edkadashi Vrat) केले जाते. यंदा विजया एकादशीचे व्रत 27 फेब्रुवारीला होणार आहे. यावर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी (Vijaya Ekadashi Tithi) 26 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी सकाळी 10.39 वाजता सुरू होईल आणि रविवारी सकाळी 8.12 वाजता समाप्त होईल. यावर्षी विजया एकादशी व्रत सर्वार्थ सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योगात आहे आणि हे दोन्ही योग 27 फेब्रुवारीला सकाळी 8:49 पासून सुरू होतील. दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 वाजता सर्वार्थ सिद्धी योग आणि पहाटे 5:42 वाजता त्रिपुष्कर योग पूर्ण होईल.
Also Read:
अशी करा पूजा –
धूप-अगरबत्ती, फुले, चंदन, तुळस इत्यादींनी भगवान विष्णूची पूजा करा. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच या दिवशी पूजेत तुळशीचा समावेश करून भगवंताची व्रत कथा ऐकणे आणि श्री हरीची आरती करणे गरजेचे आहे. संध्याकाळी आरती करून फळांचे भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाला भोजन द्यावे आणि यथाशक्ती दान आणि दक्षिणा देऊन निरोप द्यावा.
काय आहे व्रत कथा –
असे म्हणतात की, लंकेच्या चढाईच्या मार्गात महासागर येत होता. पुढे कोणताही मार्ग दिसत नसल्याने श्रीरामांनी चिंता व्यक्त केली आणि लक्ष्मणाला विचारले की आपण पुढे कसे जाऊ शकतो. तेव्हा लक्ष्मणाने सांगितले होते की, थोड्या अंतरावर वक्दलाभ्य मुनींचे आश्रम आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. यानंतर श्रीराम लक्ष्मणासह वक्दल्भ्य मुनींच्या आश्रमात पोहोचले. त्यांना नमस्कार करून त्यांचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. ऋषी म्हणाले, ‘हे राम, तू तुझ्या सैन्यांसह फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत ठेवशील. या एकादशीचे व्रत करून तू नक्कीच महासागर पार करून रावणाचा पराभव करशील.’ त्या तिथीला श्री रामचंद्रजींनी आपल्या सैन्यांसह ऋषींनी दिलेल्या नियमांनुसार एकादशीचे व्रत ठेवले आणि समुद्रावर सेतू बांधून लंकेवर चढाई केली. राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यात रावण मारला गेला. तेव्हापासून ही एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. श्रीकृष्णाने अर्जुनाला याबद्दल सांगितले.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या