मुंबई : अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दशमी तिथीला विजयादशमी (Vijayadashami 2021) हा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी दसरा (Dusara 2021) देखील साजरा केला जातो. दसऱ्याला दशहरा असे देखील म्हटले जाते. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरणे असा अर्थ या शब्दाचा अर्थ होतो. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. दसरा हा नवरात्री संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. यावर्षी 15 ऑक्टोबर 2021 रोजी विजयादशमी आणि दसरा आहे. (Vijayadashami 2021: When is Vijayadashami? What is the relationship with Ramayana and Mahabharata? Dusara 2021 )Also Read - Gold Rate Today: खूशखबर! दसऱ्याच्या मुहुर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा दर

प्रभू श्रीरामांनी केला होता रावणाचा वध

हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला आणि लंकेवर विजय मिळवला. प्रभू श्री रामाच्या या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे देखील म्हटले जाते. दसरा हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. देशात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दसरा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन विधी देखील केला जातो. प्राचीन काळापासून या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी लोक शस्त्रासोबत वाहन पूजन देखील करतात. दसरा हा सडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्ये केले जातात. नवीन वाहन खरेदी, नवीन कामाची सुरुवात, सोने खरेदी अशी अनेक कामं केली जातात. Also Read - Dasara 2021: कधी आहे दसरा? जाणून घ्या महत्त्व, तिथी, शुभ मुहूर्त आणि शस्त्र पूजा विधी

पांडवांनी केली होती शस्त्र पूजा

दरम्यान, दसरा या सणाचा संबंध हिंदू धर्मग्रंथ महाभारताशी देखील जोडला गेला आहे. पांडव पूत्रांनी अज्ञातवासात असताना शमीच्या वृक्षावर आपली शस्त्रे ठेवली होती आणि आज्ञातवास संपताच त्यांनी शक्तीपूजन करून ती शस्त्रे परत घेतली आणि विराट राजाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्याशी लढा देऊन याच दिवशी विजय मिळवला. त्यामुळे देखील या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन आणि शस्त्रपूजा करण्याची प्रथा आहे. (Vijayadashami 2021: When is Vijayadashami? What is the relationship with Ramayana and Mahabharata? Dusara 2021 ) Also Read - Ghatasthapana 2021: नवरात्रीत अशी करा घटस्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी