मुंबई : प्रत्येक व्यक्तीला फ्रेश आणि ग्लोइंग स्किन (Fresh and glowing skin) हवी असते. यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे साबण आणि क्रिमचा (soap and cream) वापर करत असतात. पण बऱ्याचदा त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. अशामध्ये अनेक घरगुती उपाय (Home remedies) करुन बरेच फायदे होत असल्याचे दिसून येते. घरगुती पद्धतीनेच तुम्ही कलिंगडचा (Water Melon) वापर करुन चांगली आणि ग्लोइंग स्किन मिळवू शकता. Also Read - Raw Milk Skin Care Tips: कच्च्या दुधाचा या 3 पद्धतीने वापर करुन मिळवा मुलायम त्वचा!

उन्हाळ्यामध्ये टॅनिंग (Tanning), घाम (sweating) आणि पिंपल्स ( pimples) येणं ही सामान्य गोष्ट आहे. उन्हाळा (Summer) संपून आता काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तरी सुद्धा उष्णता काही कमी झाली नाही. उष्णतेपासून होणारा त्रास कमी व्हावा यासाठी मोठ्याप्रमाणात कलिंगड खाल्ले जाते. कलिंगड शरीरासाठी खूप फायदेशी आहे. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते. अशामध्ये शरीसासोबतच स्किनसाठी देखील कलिंगड खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला ग्लोइंग स्किनसाठी कलिंगडाचा फेसपॅक (Water Melon Face Pack) कसा तयार करायचा हे सांगणार आहोत… Also Read - Dalimbachya Saliche Fayde: डाळिंबासह त्याची सालही खूप उपयुक्त; स्त्रियांनी असा करा वापर

कलिंगडाचा फेसपॅक तयार करण्यासाठीचे साहित्य –

– एक चमचा बेसन पीठ
– एक चमचा मुलतानी माती
– एक चमचा चंदन पावडर
– एक चमचा दही
– कलिंगडाचा रस Also Read - Home Remedies To Control Thyroid: थायरॉईडमुळं गर्भ राहत नाहिये? मग असा करा कांद्याचा वापर

असा तयार करा कलिंगडाचा फेसपॅक –

बेसन पीठ, मुलतानी माती, चंदन पावडर, दही आणि कलिंगडाचा रस हे सर्व साहित्य एका वाटीमध्ये घ्या. त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट फक्त 15 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

असा सुद्धा तयार करु शकता फेसपॅक –

– कलिंगडाचा रस
– अर्धे केळं
– एक चमचा चंदन पावडर
– एक चमचा तांदळाचे पीठ

फेसपॅक तयार करण्याची कृती –

कलिंगडाचा रस, अर्धे केळं, चंदन पावडर आणि तांदळाचे पीठ एका वाटीमध्ये घ्या. त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट फक्त 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

कलिंगडाच्या फेसपॅकचे फायदे –

कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, प्रोटिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फोरससारखे गुण असतात. यामुळे त्वचेवर काळापणा येत नाही. कलिंगडाचा फेसपॅक तुमच्या स्किनचा ग्लो वाढवतो. त्यासोबतच तुमच्या त्वचेचे मुरुम, टॅनिंग, पिंपल्स या समस्येपासून रक्षण करतो.