Top Recommended Stories

Weight Gain After Surgery: शस्त्रक्रियेनंतर तुमचं वजन वाढलं आहे का? मग करा 'हे' उपाय

Weight Gain After Surgery: शस्त्रक्रियेमुळे सतत तणावामुळे हार्मोनल बदल, शरीरात पाण्याचे असंतुलित प्रमाण, शस्त्रक्रियेमुळे झालेल्या शारीरिक आणि मानसिक जखमा आदि कारणाने वजन वाढीची समस्या निर्माण होते. 

Published: August 26, 2022 8:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Weight Gain After Surgery: शस्त्रक्रियेनंतर तुमचं वजन वाढलं आहे का? मग करा 'हे' उपाय
Weight Gain After Surgery: शस्त्रक्रियेनंतर तुमचं वजन वाढलं आहे का? मग करा 'हे' उपाय

Weight Gain After Surgery: हल्लीच्या धावपळीच्या या युगात प्रत्येकाची जीवनशैली (Lifestyle Tips) बदलली आहे. या परिस्थितीत बहुतांश जणांना वजन वाढीची (Weight Gain) समस्या निर्माण झाली आहे. वजन वाढीचे अनेक करणे असून कधीकधी गर्भधारणा किंवा शस्त्रक्रिया देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. शस्त्रक्रियेनंतर वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची असंतुलित पातळी. कारण शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातील ऊतींमध्ये अनेक बदल होतात. शरीराच्या ऊतींमधील अंतर किंवा एडेमा प्लाझ्मा प्रोटीन्समुळे वजन जलद गतीने वाढू शकते. शस्त्रक्रियेनंतर वजन वाढणे (Weight Gain Problem) ही आजकाल एक सामान्य आहे. मात्र अधिक प्रमाणात वजन वाढणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. तुमचे ही शस्त्रक्रियेनंतर वजन वाढले असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आम्ही शस्त्रक्रियेनंतर वाढलेले वजन कमी (Weight Loss Tips) करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

शस्त्रक्रियेनंतर वजन वाढण्याचे हे आहे कारण

शस्त्रक्रियेमुळे सतत तणावामुळे हार्मोनल बदल, शरीरात पाण्याचे असंतुलित प्रमाण, शस्त्रक्रियेमुळे झालेल्या शारीरिक आणि मानसिक जखमा, शस्त्रक्रियेमुळे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणे किंवा पडून राहणे आणि शस्त्रक्रियेनंतर जास्त साखरेचे पदार्थ खाणे हे वजन वाढण्याचे प्रमुख करणे आहेत. यासह इतर करणे देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.

You may like to read

हे उपाय करा

आहारात समाविष्ट करा हे पदार्थ – शस्त्रक्रियेनंतर सकस आहारासोबत तुम्ही तुमच्या आहारात जिरे आणि हिबिस्कस सारख्या औषधी वनस्पतींचा समावेश करू शकता. हे पदार्थ नैसर्गिक पद्धतीने शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

व्यायाम करा- शस्त्रक्रियेनंतर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हळूहळू काही साधे व्यायाम आणि योगाचा सराव करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोठलाही व्यायाम किंवा योग अभ्यास करू नका.

एकाच ठिकाणी बराच वेळ बसू नका- शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेताना तुम्ही एकाच ठिकाणी बराच वेळ बसणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही वेळाने तुम्ही चालायला सुरुवात करू शकता.


डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा- शस्त्रक्रियेनंतर काही दिवस डॉक्टरांनी सांगितलेले नियम पळाले पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणे आहार घ्या. चुकीच्या पद्धतीने किंवा कमी अधिक प्रमाणात अन्नाचे सेवन करू नका. काही लोक बरे वाटण्यासाठी अधिकचे खाणे-पिणे सुरू करतात असे न करता काही दिवस खबरदारी घेत डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणेच आहार घ्या.

(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>