Weight loss Tips In Marathi: वजन कमी करण्यासाठी प्या हा काढा, सर्वात प्रभावी घरगुती उपाय
Weight loss Tips In Marathi : वाढत्या वजनाच्या समस्येमुळं अनेक जण त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी काहीजण महागडी औषधे वापरतात. मात्र आपल्या सभोवताली निसर्गाने दिलेल्या अशा काही वनस्पती आहे ज्या सहज उपलब्ध होतात.

Weight loss Tips In Marathi: वाढत्या वजनाच्या समस्येमुळं अनेक जण त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी (weight loss) करण्यासाठी काहीजण महागडी औषधे (expensive medicine) वापरतात. मात्र आपल्या सभोवताली निसर्गाने (nature) दिलेल्या अशा काही वनस्पती (plants) आहे ज्या सहज उपलब्ध होतात. महागड्या औषधापेक्षा कितीतरी पटीने या वनस्पती लाभ देतात. अशाच एका सहज उपलब्ध होणाऱ्या औषधीबाबत आपण जाणून घेऊया.
Also Read:
कडुनिंबाच्या पानांचा काढा
कडुनिंबाच्या पानांचे (Neem leaves) सेवन शरीरासाठी फार उपयुक्त (neem benefits) असते. यामुळं शरीराला अनेक फायदे होतात आणि अनेक व्याधींचा नाश होतो. त्वचे संबंधी समस्येपासून (skin problem) ते मूत्रपिंड (kidney) आमि यकृतसंबंधीच्या (liver) आजारांवर कडुनिंबाच्या पानांचं सेवन उपयुक्त ठरते. कडुलिंबाच्या पानांमध्ये ‘अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लॅमेटरी’ (Anti-bacterial and anti-inflammatory) गुण असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
कडुनिंबाच्या पानांचा काढा पिल्याने मेटाबॉलिज्म (metabolism) वाढते आणि कोलेस्ट्रॉलची (cholestrol) पातळी कमी होते. या काढ्यामुळे शरीरात चरबी (fat) जमा होत नाही. हा काढा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देखील वाढते. हा काढा मधासोबत (honey) प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीराचे कार्य सुरळीत राहते. वजन कमी करण्यासाठी शरीर डिटॉक्सीफाई करणे गरजेचे असते. त्यामुळे कडुनिंबाच्या पानांचा काढा पिणे उपयुक्त ठरते. या काढ्यात लिंबाचा रस (lemon juice) आणि मध घातल्यास अधिक लाभ होतो.
असा बनवा काढा
- काढा बनवण्यासाठी कडुनिंबाची ताजी पाने घ्या.
- पानांना स्वच्छ धुवून साफ करा.
- त्यानंतर एका भांड्यात 2 ते 3 ग्लास पाणी घ्या आणि गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
- पाणी उकळायला सुरुवात झाले की त्यात कडुनिंबाची पाने घाला.
- तुम्ही पानांची पेस्ट देखील काढ्यासाठी वापरू शकता.
- पाण्यात कडुनिंबाची पाने चांगली उकळू द्या.
- नंतर त्यात आलं आणि काळीमिरी घाला.
- एक ग्लास पाणी शिल्लक राल्यानंतर गॅस बंद करा.
- स्वच्छ सुती कपड्याने हा काढा गाळून घ्या.
- त्यात लिंबाचा रस आणि मध घालून सेवन करा
(हा काढा शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी प्या. काढा प्यायल्यानंतर एक तास काहीही खाऊ-पिऊ नका.)
(डिस्क्लेमर: लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)