Top Recommended Stories

Vinayak Chaturthi 2022 Date And Timing: कधी आहे विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Vinayak Chaturthi 2022 Date and Timing: हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशिष्ट महत्त्व आहे. गणपतीला आद्यपूजक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला (Vinayak Chaturthi 2022) शुभ मुहुर्तावर गणपतीची पूजा केली जाते. विघ्नहर्ता गणपती आपल्या जीवनातील सर्व प्रकारची विघ्ने दूर करतो, असं मानलं जातं.

Published: December 23, 2022 11:59 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

गणपतीचे चमत्कारिक मंत्र
गणपतीचे चमत्कारिक मंत्र

Vinayak Chaturthi 2022 Date and Timing: हिंदू धर्मात प्रत्येक चतुर्थीला आद्यपूजक गणपतीचं (Ganesh Puja in Marathi) व्रत केलं जातं. गणपती आपल्या भक्ताला कधीच रिकाम्या हाती परत पाठवत नाही. अत्यंत साध्या पूजेने देखील गणपती (Lord Ganapati) प्रसन्न होतो. भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. चला तर मग जाणून घेऊ, कधी आहे विनायक चतुर्थी आणि शुभ मुहूर्त…

हिंदू पंचांगनुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थीचं व्रत केलं जातं. येत्या सोमवारी म्हणजे 26 डिसेंबर 2022 रोजी विनायक चतुर्थी आहे. पहाटे 4 वाजून 51 मिनिटांला चतुर्थी प्रारंभ होत असून दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबरला रात्री 1 वाजून 30 मिनिटांला समाप्त होत आहे.

You may like to read

उदयतिथीनुसार, 26 डिसेंबरल विनायक चतुर्थी व्रत केले जाईल. सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 45 ​मिनिटांला सर्वार्थ सिद्धि योग राहील. या शुभ मुहूर्तात गणपती पूजन केल्यास जीवनातील सर्व दोष दूर होतात.

विनायक चतुर्थीची पूजी विधी..

हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीप्रमाणेच विनायक चतुर्थीला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने गणपती प्रसन्न होतो. सकाळी लवकर उठून स्नान करावा. शुभ्र वस्त्र परिधान करून घरातील देव्हारा स्वच्छ करावा. नंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पाटावर टाकावे. त्यावर नागेल पान ठेवून गणपतीच्या रुपात पूजेची सुपारी ठेवावी. गंगाजलाने शुद्धिकरण करून घ्यावे. चंदनाने गणपतीचं औक्षण करावे. दूर्वा अर्पण करून 21 लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य द्यावा. दिवसभर उपवास करावा. फलाहार घेऊ शकतात. रात्री चंद्र घ्यावे. चंद्राला अर्घ्य द्यावे, त्यानंतर व्रत संकल्प करावा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. India.Com याचे समर्थन करत नाही. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.