World Malaria Day 2022: तापासह डोकेदुखी व उलट्यांचा त्रास, ही लक्षणे दिसताच तात्काळ करा मलेरियाची टेस्ट
World Malaria Day 2022: आज जागतिक मलेरिया दिन आहे. मलेरियावर वेळेवर उपचार न घेतल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. आज या निमित्ताने आम्ही या आजाराच्या अशा काही लक्षणांविषयी सांगणार आहोत, ज्याचे निदान झाल्यास त्वरीत मलेरियाची चाचणी करून घ्यावी.

World Malaria Day 2022: आज जागतिक मलेरिया दिवस (Malaria Day 2022) आहे. दरवर्षी 25 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. मलेरिया हा एक जीवघेणा आजार असून तो वेळेवर ओळखून उपचार (Malaria Treatment) न केल्यास हा धोकादायक आजार रुग्णाचा जीव घेऊ शकतो. मलेरिया दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही अशा लक्षणांविषयी (Malaria symptoms) सांगणार आहोत, ज्याचे निदान झाल्यानंतर लगेचच मलेरियाची चाचणी (Malaria test) करून घ्यावी. पण त्याआधी मलेरिया कसा होतो (How does malaria occur) हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Also Read:
मलेरिया कसा होतो?
मलेरिया हा मादी अॅनोफिलीस डासाच्या चावण्याने होतो (जो मलेरिया होण्यास कारणीभूत असलेल्या प्लास्मोडियम परजीवीमुळे संक्रमीत होतो). डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार जगातील जवळपास निम्म्या नागरिकांना मलेरियाचा धोका आहे. गरीब देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार, सन 2022 मध्ये, सुमारे 241 दशलक्ष लोकांना या जीवघेण्या आजाराची लागण झाल. त्यापैकी बहुतेक प्रकरणे ही आफ्रिकेत समोर आली. परंतु डब्ल्यूएचओचा असा विश्वास आहे की जर मलेरियावर योग्य वेळी उपचार घेतले तर तो रोखणे शक्य आहे. परंतु बरेच लोक पुरेशा आरोग्य सेवेपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना जीव गमावावा लगातो.
ही लक्षणे दिसल्यास त्वरित करा तपासणी
1. ताप येत असेल.
2. त्यासोबत डोकेदुखी देखील होत असेल.
3. उलट्या होणे आणि मळमळ सारखी लक्षणे दिसणे.
4. थंडी जाणवणे किंवा थरथर वाटणे.
5. अशक्तपणा आणि चक्कर येणे.
6. नेहमी थकवा जाणवणे. चालावेसेही न वाटणे.
7. स्नायूंमध्ये वेदना होणे.
8. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होणे. डोळे पिवळे पडणे.
9. मलावाटे रक्त पडणे.
मलेरियाने प्राणघातक रुप घेतले तर?
मलेरियावर वेळेवर उपचार न केल्यास तो यकृत आणि फुफ्फुसात परसतो आणि ते अवयव संपवतो. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊ लागते. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. लाल रक्तपेशी कमी होतात. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या