World No Tobacco Day 2022: तंबाखू, विडी-सिगारेटची सवय सोडायची असेल तर हे नक्की वाचा!
World No Tobacco Day 2022: तंबाखूमुळे कर्करोग होता, हे सगळ्यांना माहित आहे. परंतु तरी देखील बहुतांश लोक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात.

World No Tobacco Day 2022: आज, 31 मे… जागतिक तंबाखू विरोधी दिन अर्थात ‘वर्ल्ड नो टोब्यको डे’. (World No Tobacco Day) तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन (Smoking) करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी सर्वत्र हा दिन साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे (Cigarette) सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसतात. घर असो कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरुणाई देखील मोठ्या संख्येने धुम्रपानाच्या व्यसनाला बळी पडत असल्याचे समोर आले आहे. तंबाखू खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो. सोबतच दात कमजोर होतात.
Also Read:
तंबाखूमुळे कर्करोग होता, हे सगळ्यांना माहित आहे. परंतु तरी देखील बहुतांश लोक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात. आज आम्ही जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सोडण्यासाठी उपाय सांगत आहोत.
तंबाखू हा एक उत्तेजक पदार्थ आहे. यात निकोटीन असते. निकोटीन हा उत्तेजित करणारा घटक असतो. निकोटीन थेट रक्तात मिसळते आणि मेंदूमध्ये एका प्रकारची झिंग तयार करते. म्हणून तंबाखू खाणे ही एकप्रकारचे व्यसनच आहे. तसेच सारखी तोंडात धरून ठेवल्याने तोंडाचा कॅन्सर देखील होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तंबाखू सोडण्यासाठी अनेक घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. प्रामुख्याने इच्छाशक्तीची गरज असते. इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून तुम्ही दूर जाऊ शकतात.
काय आहेत तंबाखू सोडण्यासाठी उपाय?
– तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन सोडण्याचा मनाशी दृढ निश्चय करा.
– अचानक तंबाखू सोडायचा विचार करू नका, टप्प्याटप्प्याने तंबाखू खाणे कमी करा.
– तंबाखूऐवजी ज्येष्ठमधाचे तुकडे खिशात ठेवा. तंबाखू खायची इच्छा होईल तेव्हा ज्येष्ठमधाची काडी तोंडात टाका. ज्येष्ठमध मुखशुद्धीसाठी देखील चांगले आहे.
– सिगारेट, पान आणि जर्दा लवकर मिळतील, अशा ठिकाणी ठेवू नका.
– धूम्रपान करण्यासाठी प्रेरीत करणारे कारणे ओळखा. त्या ऐवजी पान खा, चॉकलेट खा.
– तुमचे जे जे मित्र, सहकारी सिगारेटी, पान, जर्दा खात असतील. त्यांना टाळण्याचा प्रयत्न करा.
– जेव्हा तल्लफ येईल तेव्हा उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते.
– तंबाखू किंवा तंबाखूजन्य सेवनाची तल्लफ येईल तेव्हा तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा. तुमच्यावर तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी विचार करा.
– तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी ओव्यासोबत लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये काळे मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे मिश्रण खा.
– बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा. हे मिश्रण हळूहळू चघळा. यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणे सुकर होते.