By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
World Social Media Day 2022 : का साजरा केला जातो सोशल मीडिया दिन ? जाणून घ्या इतिहास...
World Social Media Day 2022 : लोकांवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम समाजावर होतात. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'जागतिक सोशल मीडिया डे' साजरा केला जातो.

World Social Media Day 2022 : सध्या इंटरनेटच्या या जगात सोशल मीडियाचा (Social Media) मोठा बोलबाला आहे. सोशल मीडिया ज्यांना माहीत नाही किंवा जे आजच्या काळात सोशल मीडियावर (Social Media Users) अॅक्टिव्ह नाही असे लोक शोधणे कठीण आहे. जवळपास प्रत्येक जण आता सोशल मीडियाचा वापर करत आहे. ‘सोशल मीडिया डे’ (Social Media Day) दरवर्षी 30 जून रोजी साजरा केला जातो. सोशल मीडियाचा प्रभाव आणि जागतिक संवादामध्ये त्याची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाशी संबंधित इतिहास (Social Media History) जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजचा आमचा हा लेख याच विषयावर आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोशल मीडिया डे (Social media Day 2022) का साजरा केला जातो याविषयी माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास.
Trending Now
हा आहे सोशल मीडिया डेचा इतिहास
हल्लीच्या या युगात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. 30 जून 2010 रोजी जगभरात सोशल मीडिया डे साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून हा दिवस जागतिक सोशल मीडिया दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा दिवस का सुरु झाला? तर या मागचा इतिहास असा आहे की, पूर्वी सोशल मीडियाचा लोकांवर फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभाव, जागतिक संवाद आणि त्याची भूमिका अधोरेखित करण्यासाठी जागतिक सोशल मीडिया डे साजरा करण्यास सुरुवात झाली.
पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
सिक्सडिग्री हे जगभरात लॉन्च करण्यात आलेले पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होते. जे 1997 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या प्लॅटफार्मची स्थापना अँड्र्यू वेनरिच यांनी केली होती. 2001 मध्ये, या सोशल मीडिया प्लॅटफार्मचे 1 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते होते. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात वापरकर्ते असतांना देशील हे प्लॅटफार्म बंद करण्यात आले.
आजचे सोशल मीडिया प्लॅटफार्म
आजच्या काळात ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, स्नॅपचॅट या सारखी अनेक प्लॅटफॉर्म लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचे स्वरूपही बदलले आहे. युजर्सची गरज लक्षात घेत त्यात नवनवीन अपडेट केले जात आहे. अशा या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हजारो मैल दूर बसलेल्या व्यक्तीशी मेसेज, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकता. त्याच वेळी, आपण एका बटणावर जगातील सर्व माहिती मिळवू शकतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या