Hanuman Puja Benefits: मंगळवारी भगवान हनुमानाची अशी करा पूजा, पण ही कामं करणं टाळा नाही तर...

Hanuman Puja Benefits : मंगळवारी हनुमानाची पुजा करणे चांगले असते. या दिवशी बजरंग बाणाचे पठन केले तर भक्तावर बजरंगाची कृपा कायम राहते असे म्हटले जाते.

Updated: January 18, 2022 12:28 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

bhagwan ki arti kyo ki jati hai importance of arti after pooja astrology significance of aarti

Hanuman Puja Benefits: हनुमान (Hanuman) हे असे दैवत आहे ज्याची अनेक जण भक्तीभावाने पुजा करतात. मंगळवारी (Tuesday) श्रीराम भक्त नित्यनेमाने हनुमानाची पूजा करतात. श्री हनुमानची पूजा (Hanuman Puja) आराधना केल्याने माणूस प्रत्येक प्रकारच्या भयातून मुक्त होतो असे म्हटले जाते. हनुमानाला दुःख दूर करणारा देव मानले जाते. मंगळवारी हनुमानाची पुजा करणे चांगले असते. या दिवशी बजरंग (Bajrang) बाणाचे पठन केले तर भक्तावर बजरंगाची कृपा कायम राहते असे म्हटले जाते.

Also Read:

हनुमानाला कलीयुगातील जागृत देव मानले जाते. भगवान हनुमान आपल्या भक्‍तांचे सर्व कष्ट दूर करतात. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने चांगले पुण्य प्राप्त होते. मंगळवारी पूजा केल्यामुळे भगवान हनुमान प्रसन्न होतात. तसंच आपल्या भाविकांच्या इच्छा देखील पूर्ण करतात. हनुमानाला संकटमोचक असे म्हटले जाते. त्यांची पूजा केल्यामुळे आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात.

भगवान हनुमान हे श्रीरामाचे मोठे भक्त आहेत. त्यामुळे राम भक्त हनुमानची देखील पूजा करतात. हनुमानाला महादेवाचे अवतार असल्याचे देखील मानले जाते. हनुमानजी यांची पूजा मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी करणे विशेष लाभदायक असल्याचे मानले जाते. हनुमानजी यांची पूजा विधीवत केली पाहिजे असे केल्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ तुम्हाला प्राप्त होईल. मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही उपवास ठेवला तर हनुमानजींचा आर्शीवाद तुम्हाला मिळेल.

अशी करा हनुमानाची पूजा :

हनुमानजींची पूजा सकाळी स्नान करुन करावी. हनुमानजींच्या पूजेत स्वच्छता आणि नियमांचे विशेष पालन करणेचे गरजेचे आहे. त्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टींचीही विशेष काळजी घ्यावी लागते. खाली दिल्याप्रमाणे भगवान हनुमानाची पूजा करा…

– हनुमानजींच्या मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. यापुढे हनुमान चालीसाचं पठन करा.

– तसेच एका पात्रात गंगाजलचे काही थेंब मिसळून ठेवा.

– पूजेनंतर हे जल प्रसाद म्हणून ग्रहण करा.

– हनुमानजींच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा

– हनुमानजींना मंगळवारीला चोला अर्पित केल्याने ते अधिक प्रसन्न होतात

– हनुमानजींना लाडू, गुळ आणि चण्याचा प्रसाद दाखवा

– पूजा समाप्त झाल्यावर याला प्रसाद म्हणून ग्रहण करा

मंगळवारी तुम्ही हे काम करु नका :

– हनुमानजींच्या पूजेत नियमांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी अस्वच्छतेपासून दूर राहा. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

– मंगळवारच्या दिवशी मनात चुकीचे विचार येऊ देऊ नका.

– रागावर कंट्रोल करा. क्रोध आणि लोभापासून दूर राहा.

– या दिवशी कुणाचा अपमान आणि अनादर करु नका.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 18, 2022 12:27 PM IST

Updated Date: January 18, 2022 12:28 PM IST