Top Recommended Stories

Yawning Cause: तुम्हालाही वारंवार येते का जांभई? जाणून घ्या काय आहे कारण

Yawning cause: जांभई येणे ही सामन्य शारीरिक क्रिया आहे. परंतु, सतत जांभई येत असेल तर ते एखाद्या शारीरिक समस्येचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे त्यामागील कारण आणि उपाय जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Published: April 26, 2022 9:43 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Yawning Cause: तुम्हालाही वारंवार येते का जांभई? जाणून घ्या काय आहे कारण
Yawning cause

Yawning cause: जांभई (Yawning) येणे ही बर्‍याचदा सामान्य सवयींपैकी एक मानली जाते. परंतु जर एखाद्या व्यक्तीला वारंवार जांभई (frequent Yawning) येत असेल. तर ते एखाद्या शारीरिक समस्येचे लक्षण देखील (physical problem) असू शकते. होय, अशा परिस्थितीत या समस्यांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला वारंवार जांभई का येते याविषयी सांगणार (Health Tips) आहोत. यासोबतच यापासून समस्येपासून बचाव करण्यासाठीचे काही उपायही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊन जाम्भई का येते आणि त्यामागील कारण काय आहेत.

Also Read:

वारंवार जांभई येण्याची कारणे

  • जर एखाद्या व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त जांभई येत असेल. तर याचा अर्थ तुम्हाला पुरेशी झोप मिळालेली नाही. हे थकव्याच्या लक्षणांपैकी एक आहे. जर तुम्हाला दिवसा देखील वारंवार जांभई येत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
  • जेव्हा एखादी व्यक्ती जास्त काळ नैराश्यात असते. तेव्हा त्याला वारंवार जांभई येते. हे नैराश्य आणि नैराश्याच्या लक्षणांपैकी एक आहे. उदासीनतेमुळे वारंवार जांभई येत असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
  • ज्यांना अपस्माराचा त्रास होतो त्यांनाही वारंवार जांभई येते. त्यांना थकव्यामुळे अशी वारंवार जांभई येते. प्रकाराकडे दुर्लक्ष करू नका.
  • भीती आणि चिंतेमुळे एखाद्या व्यक्तीला वारंवार जांभई येऊ शकते. जेव्हा चिंता वाढते तेव्हा त्याचा परिणाम श्वसनसंस्थेवर आणि ऊर्जेच्या पातळीवर होतो. ज्यामुळे श्वास लागणे, तणावाची समस्या, वारंवार जांभई येणे इत्यादी समस्या उद्भवतात.

हे उपाय करु शकता

सतत जांभई येत असेल तर थंड पाणी प्यायल्यानेही जांभई येण्याची समस्या कमी करता येऊ शकते. दिर्घ श्वास देखील घेऊन शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवा किंवा नाकातून श्वास आत घेऊन तोंडाद्वारे बाहेर टाका यामुळे देखील तुम्हाला आराम मिळेल. हसल्यामुळे जांभईचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सतत जांभई येत असल्यास एखादा विनोदी व्हिडीओ पाहा. याशिवाय आईस टी किंवा आईस कॉफीदेखील तुम्हाला जांभईपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करू शकते.

You may like to read

(टीप – लेखात दिलेली माहिती ही सामन्य आणि उपलब्ध माहितीच्या आधारे दिलेली आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 26, 2022 9:43 PM IST