महिलांना मासिक पाळीच्या (Regular Menstrual Cycle With Yoga) वेळी अनेक शारीरिक आणि मानसिक समस्येला सामोरं जावं लागत असतं. यामध्ये महिलांना पाठदुखी, पोटदुखी यासारख्या अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. अनेक महिला हा त्रास दूर करण्यासाठी विविध उपाय करतात. मात्र, मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून झटपट आराम मिळवण्यासाठी तुम्हाला ही योगासनं फायदेशीर ठरू शकतात. (Yoga Benefit in MC Period)Also Read - Health Tips : डायबिटीजच्या रुग्णांनी असे करा हळदीचे सेवन, कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर लेव्हल!

चला दर मग महिलांना मासिक पाळीत शारीरिक समस्या दूर करण्यासाठी कोणती योगासनं फायदेशीर ठरतात, त्या योगासनांबाबत जाणून घेऊ या… Also Read - Health Tips : शरीरात साचलेली घाण काही दिवसांत होईल नाहीशी, सकाळी रिकाम्या पोटी प्या हे पेय!

भ्रामरी प्राणायाम (Bhramri Pranayam)

भ्रामरी प्राणायाम (Bhramri Pranayam) हे आपलं ताणतणाव आणि चिंतापासून मुक्त देत असते. मासिक पाळीदरम्यान (Menstrual Cycle) कोणताही व्यायाम सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. भ्रामरीमुळे तुमचं डोकं स्थीर राहील. त्याचबरोबर शारीरिक वेदना देखील इटपट दूर होतात. Also Read - Weight Loss Tips : आता वेगात होईल वजन कमी, फक्त रोज रात्री पाण्यामध्ये टाकून प्या ही गोष्ट!

मलासन (Malasana)

मलासन (Malasana) करणं हे मासिक पाळीदरम्यान (Menstrual Cycle) महिलांसाठी फायदेशिर असतं. मलासनामुळे नितंब आणि मांडीचा अंतर्गत भाग उघडण्यास मदत होते. यामुळे शरीराला विश्रांती मिळते.

बद्ध कोनासन (Baddha Konasana)

बद्ध कोनासन (Baddha Konasana) हा एक योगासनाचा उत्तम प्रकार आहे. महिलांनी मासिक पाळीदरम्यान बद्ध कोनासन करणं अधिक फायदेशीर आहे. या आसनाने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. त्यासोबतच तणाव कमी होतो.

बलासन (Halasana)

बलासन (Halasana) हे महिलांसाठी उत्तम आसन आहे. मासिक पाळीच्या त्रासापासून महिलांची सुटका करण्यासाठी या आसनाची मोठी मदत होते. बहुतांश महिलांना मासिक पाळीत पाठदुखीचा त्रास उद्भवतो. बलासन केल्यामुळे हा त्रास झटपट कमी होती. डोकं शांत राहतं. त्याच बरोबर शरीराला विश्रांती मिळते.

सुप्त बद्ध कोनासन (upta Baddha Konasana)

सुप्त बद्ध कोनासन (Supta Baddha Konasana) करण्यासाठी हळू हळू सराव करा. या आसनादरम्यान पाठीवर झोपणे आवश्यक आहे. हे आसन करत असताना हळूहळू गुडघ्यापर्यंत वाकल्यानं कंमर आणि पाठ दुखी दूर होते.