मुंबई : आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लोक लठ्ठपणाची शिकार होत आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण विविध पद्धतींचा अवलंब करतात. मात्र, तुम्हालाही वजन कमी ( Weight Loss) करायचं असेल तर योगापेक्षा दुसरा उत्तम पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता (Yogasan For Weight Loss) आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला अशा काही योगासनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळं तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.Also Read - Benefits of CCF Drink: रोज लंच आणि डिनरनंतर प्या हा चहा; महिलांच्या या समस्येवर रामबाण उपाय

वीर भद्रासन : हे आसन करण्यासाठी, एक पाय मागे खेचून दुसरा पाय पुढे घेत उडी घेण्याची मुद्रा बनवा. यावेळी गुडघे 90 डिग्री अंशांत असतील आणि हात जोडून डोक्याच्या वरच्या बाजूस घ्या. विरभद्रासन -2 साठी, आपण या मुद्रेला पुढे घेऊ शकता. यामध्ये आपले हात छातीसमोर घ्या आणि ताणलेले पाय (बाहेरच्या बाजूने काढत) सरळ करा. याचवेळी दुसरा पाय 90 अंशांवर ठेवा आणि आपले दोन्ही हात ताणून बाहेरच्या बाजूने पसरवा. ही योद्धा मुद्रा आपले पाय, मांडी, पाठ आणि हात मजबूत बनवण्यासाठी कार्य करते. एवढंच नाही तर हे आसन केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया देखील उत्तम होण्यास मदत होते. Also Read - International Yoga Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केलं M-Yoga App, जाणून घ्या वैशिष्ट्ये..

सूर्य नमस्कार : सूर्य नमस्कार म्हणजे ‘सूर्याला अभिवादन’ किंवा ‘सुर्याचे वंदन करणे’. यामध्ये विविध 12 मुद्रांचं मिश्रण असते. या मुळं शरीराच्या विविध भागाना मजबूती मिळण्यास मदत होते. या वैशिष्ट्यांमुळंच सुर्यनमस्कार संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतो. सूर्यनमस्कार हा शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा एक चांगला मार्ग असल्याचा अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे. कारण यामुळे शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाचा व्यायाम होण्यास मदत मिळू शकते. Also Read - Yoga For Better Sleep: तुम्हालाही रात्री शांत झोप लागत नाही? मग करा हे सोपे योगासन

भुजंग आसनः सर्वप्रथम आपल्या पोटावर झोपा. आता आपल्या तळहातांना आपल्या खांद्यांसह सरळ रेषेत आणा. या दरम्यान आपल्या दोन पायांमधील अंतर कमी करा तसेच पाय सरळ आणि ताणून ठेवा. आता श्वास घेत शरीराचा पुढील भाग नाभीपर्यंत वर उचलून घ्या.

पादहस्तासन : पादहस्तसान करण्यासाठी तुम्हाला सरळ उभे रहावं लागेल. कंबरेतून वाकून आपल्या बोटांनी आपले पाय स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आपले हात आपल्या पायाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद असेच रहा आणि त्यानंतर हळूहळू पुर्वपदावर या. हे आसन करताना खाली वाकल्यामुळं पोटावर दबाव पडतो. यामुळं आपल्या पोटाचा व्यायाम होतो.

हलासन : हे आसन करण्यासाठी सपाट जमीनीवर पाठीवर झोपा आणि आपले दोन्ही हात आरामशीर मुद्रेत जमिनीवर सरळ ठेवा. दीर्घ श्वास घेत पोटातील स्नायूंच्या मदतीने आपले पाय वर उचला आणि दोन्ही पाय 90 अंशांच्या कोनात उचलून धरा. श्वसनक्रिया सामान्य ठेवत हातांच्या मदतीने आपली कंबर आणि पाठ जमीनीवरून वर उचला. आता आपले पाय डोक्यावरून मागे नेत 180 अंशांच्या कोनात वाकवा. पायांचे बोटे जमीनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.