हिंदू धर्मात (Hindu Religion) एकादशीच्या (Ekadashi) व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. संपूर्ण मराठी महिन्यात एकूण 24 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला व्रत केलं जातं. ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी ‘निर्जला’ एकादशी म्हणून ओळखली जाते. तर कृष्ण पक्षात येणारी एकादशी ‘योगिनी’ अथवा ‘शयनी’ एकादशी (Yogini Ekadashi 2021) नावानं ओळखली जाते. यंदा योगिनी एकादशी 5 जुलै 2021 साजरी केली जाणार आहे.Also Read - Raksha Bandhan 2021 Shubh Muhurta: भद्रा मुक्त काळात साजरे करा रक्षाबंधन; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

योगिनी एकादशीला श्रीविष्णू पूजनाचं महत्त्व आहे. भक्तिभावनेनं हे व्रत केल्यास पापातून मुक्तता होते. मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
Also Read - Yogini Ekadashi 2021: योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम; मानले जाते अशुभ

योगिनी एकादशी शुभ मुहूर्त (Yogini Ekadashi 2021 Shubh Muhurat)

-योगिनी एकादशी- वार- सोमवार, जुलै 5, 2021
– एकादशी तिथि प्रारंभ – जुलै 04, 2021 रोजी सायंकाळी 07 वाजून 55 मिनिटं
– एकादशी तिथि समाप्त – जुलै 05, 2021 रोजी रात्री 10 वाजून 30 मिनिटं
-6 जुलैला व्रत सोडण्याची वेळ – पहाटे 05 वाजून 29 मिनिटं ते सकाळी 08 वाजून 16 मिनिटं Also Read - Yogini Ekadashi 2021: काय आहे योगिनी एकादशीचे महत्त्व; जाणून घ्या शुभ मुहूर्त

योगिनी एकादशीचे महत्त्व (Yogini Ekadashi 2021 Importance)

हिंदु पुराणांत योगिनी एकादशीचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. कारण यानंतर आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. या एकादशीपासून श्रीविष्णू पुढील चार महिने ध्यानस्थ असतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे योगिनी एकादशीला विष्णूपूजनला खूप महत्त्व आहे.

योगिनी एकादशीचं व्रत केल्यानं पापातून मुक्तता होते. जीवन सुखसमृद्धी आणि आनंदानं भरून जातं. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. योगिनी एकादशीचं व्रत केल्यानं स्वर्गसुखाची प्राप्ती होते. विशेष म्हणजे योगिनी एकादशीचं तिन्ही लोकांत महत्त्व आहे. योगिनी एकादशीचं व्रत केल्यानं 88000 ब्राह्मण भोजन देण्याचं पुण्य मिळते.