Top Recommended Stories

10th-12th Exam Tips: विद्यार्थ्यांनो फॉलो करा या 4 टिप्स करा, पेपर सोडवणे जाईल सोपे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने 10 वी (SSC Exam) आणि 12 वी ( HSS Exam) परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर (SSC And HSC Exam Time Table 2022) केले आहे. अवघ्या महिन्याभरावर या परीक्षा येऊन ठेपल्या आहे. परीक्षेत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होता यावे यासाठी विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत.

Updated: February 8, 2022 3:23 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

10th-12th Exam Tips
10th-12th Exam Tips

10th And 12th Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने 10 वी (SSC Exam) आणि 12 वी ( HSS Exam) परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर (SSC And HSC Exam Time Table 2022) केले आहे. अवघ्या महिन्याभरावर या परीक्षा येऊन ठेपल्या आहे. परीक्षेत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होता यावे यासाठी विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. यंदा ऑफलाईन (Offline Exam) परीक्षा होणार असल्याचे शिक्षण मंडळाने आधीच जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणे सोपे जावे यासाठी काही टिप्स (Exam Preparation Tips) घेऊन आलो आहेत. जेणे करून अभ्यास करणे सोपे जाईल आणि चांगले गुण मिळविता येतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत या टिप्स..

Also Read:

सर्वात आधी संशोधन करा…

परीक्षा कोणतीही असो, परीक्षेला सामोरे जाण्याआधी संशोधन करणे गरजेचे आहे. त्यानुसार 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जरूर पाहाव्यात. यामळे तुम्हाला गेल्या काही वर्षात विचारण्यात आलेले प्रश्न त्यांच्या उत्तराचे पॅटर्न लक्षात येईल. गेल्या काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहाताना कोणत्या कन्सेप्टवर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले आहे, हे लक्षात घ्या.

You may like to read

आपल्या कामगिरीचे विश्लेषण करा…

कोणत्याही परीक्षेची तयारी करताना सराव पेपर ( Mock Test) सोडवून आपल्या कामगिरीचे विश्लेषण करावे. यामुळे तुमच्या लक्षात येईल, की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला हवा. यामुळे तुम्ही कोणत्या विषयात चांगले आणि कोणत्या विषयात कमकुवत आहात, हे लक्षात येईल.

पुनरावृत्तीवर करा लक्ष केंद्रित…

परीक्षेच्या 15 दिवस आधी कोणत्याही नवीन विषयाचा अभ्यास करू नये. या दरम्यान, तुम्ही तयार केलेल्या नोट्सचे फायनल रिव्हिजन करावे. यासह त्याची संकल्पना (Revision Tips) 2 ते 3 वेळा वाचून घ्यावी. अशा प्रकारे तुम्ही परीक्षेची चांगली तयारी करू शकतात. ( Exam Preparation Tips)

कोणत्याही विषयाला स्किप करू नका…

परीक्षेची तयारी करीत असताना आपला अभ्यासक्रम सोबत ठेवावा. अभ्यास करत असताना कोणत्याही विषयाला स्किप करू नये. यासह आधी लहान उत्तरे तयार करा. लांबलचक उत्तर असलेले प्रश्न लक्षात घेत त्यांचे वेगवेगळे भाग करावे. यामुळे तुम्ही कठीण विषय देखील सहज पाठ करू शकाल.

4 मार्चपासून सुरु होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने 10 वी आणि 12 वी परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा होईल. तर 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 दरम्यान इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 3:22 PM IST

Updated Date: February 8, 2022 3:23 PM IST