10 वी- 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसंदर्भात शिक्षणमंडळाने दिले 'हे' स्पष्टीकरण

राज्यात कोरोना आणि नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबाधीत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

Published: January 10, 2022 11:58 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

10 वी- 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसंदर्भात शिक्षणमंडळाने दिले 'हे' स्पष्टीकरण
Image for representational purposes

10th-12th Exam in Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गात (Coronavirus in Maharashtra) वाढ झाली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा (Omicron In Maharashtra) धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारने खबरदारी म्हणून आजपासून राज्यात कठोर निर्बंध (New Guidelines By Maharashtra Government) लागू केले आहेत. अशातच 10 वी (10th Exam) आणि 12 वीचे (12th Exam) वर्ग वगळता सर्व वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे काय? परीक्षा ऑफलाईन (Offline Exam) होणार की ऑनलाईन (Online Exam) याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाला आहे. मात्र, आता राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra board of education) विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा संभ्रम दूर केला आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

Also Read:

राज्यात कोरोना आणि नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबाधीत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. अशातच 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाही गेल्यावर्षीप्रमाणे परीक्षा पुढे ढकलल्या जातात का, की शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसारच होतात, याबाबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतु, 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कोरोनाचा आणि ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ठाकरे सरकारने खबरदारी म्हणून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. सोमवारपासून राज्यात हे नवीन निर्बंध लागू होतील. यासंदर्भातील नियमावली सरकारने शनिवारी जाहीर केली होती. पण आता या निर्बंधांमधील सलून (Saloon), ब्युटी पार्लर (Beauty Parlor) आणि जीम (Guym) यासंदर्भांतील निर्बंध सरकारने शिथिल केले आहेत. याबाबत सरकारने रविवारी नवे आदेश जारी केले आहेत.

रोजी रोटी बंद होणार नाही. थोडक्यात राज्यात लॉकडाऊन जाहीर होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यात आता ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून आणि जीम चालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ब्युटी पार्लर, हेअर सलून आणि जीम 50 टक्के क्षमेतेने सुरु ठेवता येणार आहे. यापूर्वी म्हणजे शनिवारी जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये जीम, सलून आणि ब्युटी पार्लर दोन्ही बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते.

काय आहेत सरकारचे नवे नियम? (Maharashtra Corona Guidelines)

> रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू
> लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 लोक
> अंत्यसंस्कारात जास्तीत जास्त 20 लोक
> सामाजिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 लोक
> सार्वजनिक मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद
> मनोरंजन पार्क, संग्रहालय, प्राणीसंग्रहालय बंद
> हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने उघडतील – रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद
> शाळा-कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, कोचिंग क्लासेस बंद
> खाजगी कार्यालयात 50 % कर्मचाऱ्यांची उपस्थिती
> लेखी परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात अभ्यागतांना परवानगी नाही.
> सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना परवानगी नाही
> स्थानिक खेळ आयोजित करण्यावर बंदी
> 50 % क्षमतेसह शॉपिंग मॉल सुरू राहणार
> 50% क्षमतेसह रेस्टॉरंट-हॉटेल सुरु ठेवण्यास मुभा
> 50 % क्षमतेसह थिएटर सुरू राहणार
> डोमेस्टिक ट्रॅव्हल- दोन्ही डोस घेतलेल्यांना किंवा 72 तासांच्या आत आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल असलेल्यांना परवानगी.
> सार्वजनिक वाहतुकीमध्ये दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी आहे
> दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 11:58 AM IST