By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
10th and 12th Results: दहावी, बारावीचा निकाल यंदा रखडणार, जाणून घ्या काय आहे कारण...
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (10th and 12th Exam) सुरू असतानाच निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता आहे.

10th and 12th Results: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (10th and 12th Exam) सुरू असतानाच निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या सुमारे 30 हजार सदस्यांनी म्हणजेच विनाअनुदानीत शिक्षकांनी यंदा उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पेपर तपासणार नाही, असा आक्रमक पवित्रा विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी घेतला आहे. शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
Also Read:
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे 1200 हून अधिक गठ्ठे तपासणीविना विभागीय मंडळात पडून आहेत. शिक्षकांना पुकारलेल्या आंदोलनावर शिक्षण मंडळाले अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
परीक्षा सुरू होण्यापूर्वीच दिले मागण्यांचे निवेदन…
दरम्यान, राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. तसेच पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दहावी-बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील कृती समितीने दिला होता. त्यानुसार विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
शिक्षकांनी स्वीकारले नाहीत गठ्ठे…
शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना उत्तरपत्रिकेचे गठ्ठे तपासणीसाठी पाठवण्यात आले असता, शिक्षकांनी ते स्वीकरले नाही. आलेले गठ्ठे परत शिक्षण मंडळाकडे परत पाठवले आहेत. विनाअनुदानित शिक्षक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलन भविष्यात कायम राहिल्यास यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.