पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर बलात्काराच्या घटनेनंतर (Pune Rape Case) पुन्हा एकदा हादरलं आहे. बर्थ-डे पार्टीला (birthday party) बोलावून 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या तळजाईच्या जंगलात (Rape in Taljai forest) ही घटना घडली आहे. पीडित तरुणीनं सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये (Pune Police) दिलेल्या तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली आहे. शुभम सीताराम शिंदे (वय-19 वर्ष, रा. धनकवडी) असं आरोपीचं नाव आहे.Also Read - Mumbai School Reopen Updates: मुंबईत ऑफलाईनसोबतच ऑनलाईन शाळाही सुरू राहणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. आरोपी शुभम याचा 5 डिसेंबरला वाढदिवस होता. त्यानं वाढदिवसाची पार्टी असल्याचं सांगून पीडितेला तळजाईच्या शेवटच्या बसस्टॅन्ड परिसरात बोलावलं होतं. पीडित तरुणी ठरल्याप्रमाणे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बसस्टॅन्डवर पोहोचली होती. तिथे आरोपी शुभम आणि त्याचा मित्र प्रतीक माने उभे होते. नंतर आरोपी, त्याचा मित्र आणि तरुणी तळजाईच्या जंगलात गेले. तिथे शुभमने बर्थ डेचा केक कापला. नंतर दोघांनी पीडित तरुणीला दारु पाजली. थंडी वाढत असल्यानं पीडित तरुणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपी शुभम यानं तरुणीवर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेच्या सगळा प्रकार लक्षात आला. पीडित तरुणीनं पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपी शुभम शिंदे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सहकारनगर पोलिस पुढील तपास करत आहेत. Also Read - School Reopen in Maharashtra: शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. पुण्यातील मुंढवा परिसरातील रहिवासी तरुणीवर तिच्याच मित्रानं तिच्याच घरात बलात्कार केला. आरोपीनं तरुणीला गुंगीचं औषध दिलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारानंतर आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून हे प्रकरण मिटवलं आहे. मात्र, पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिला शिवीगाळ केली. तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. या प्रकरणी पीडित तरुणीनं मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. Also Read - Lagir Jhala Ji: 'लागिर झालं जी' मालिकेतील अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू, पुण्याजवळ कारला झाला भीषण अपघात

पोलिसांनी नदीम बाबू शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नदीम मुंबईतील रहिवासी असून एका खासगी कंपनीत नोकरी करतो.