Top Recommended Stories

Solapur Accident: सोलापूरमध्ये कार झाडाला धडकून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

Solapur Accident : सोलापूर-विजयपूर महामार्गावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तैरामैल येथे हा अपघात झाला आहे.

Updated: January 16, 2022 2:56 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Solapur Accident
Solapur Accident

Solapur Accident : सोलापूरमध्ये (Solapur) कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये (Solapur Car Accident) तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोलापूर-विजयपूर महामार्गावर (Solapur-Vijaypur Mahamarg) हा भीषण अपघात झाला आहे. तैरामैल येथे ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून (Solapur Police) सुरु आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेले तिघेही सोलापूर येथील रहिवासी आहेत.

Also Read:

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-विजयपूर महामार्गावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तैरामैल येथे हा अपघात झाला आहे. भरधाव असलेली स्कॉर्पिओ गाडी झाडावर धडकून हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे अशी मृतांची नावे आहेत. तर या अपघातामध्ये राकेश हच्चे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

You may like to read

कार भरधाव असल्यामुळे आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. अपघातातील जखमीची प्रकती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 16, 2022 2:54 PM IST

Updated Date: January 16, 2022 2:56 PM IST